भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर कोरोनाचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:01:45+5:30

तालुक्यात उन्हाळी धान शेतीबरोबर भाजीपाल्याचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. टोमॅटो, मिरची, कारली, वांगी, काकडी विविध पीके शेतकरी घेतात. भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल यासाठी शेतकºयांनी उसनवार करीत भाजीपाला लागवड केली. मात्र यावर्षी शेतकºयांना अपेक्षित फायदा झाला नाही. पण यावर्षी भातशेती तोट्यात आल्याने भाजी पिकातून काही हाती येईल या आशेवर शेतकरी वर्गाने या वर्षी मोठा खर्च करून भाजीपाल्याची लागवड केली होती.

Corona's bowl on vegetable growing farmers | भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर कोरोनाचा बडगा

भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर कोरोनाचा बडगा

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनने आठवडी बाजार बंद । मजुरांअभावी भाजीपाला शेतातच पडून

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : तालुक्यातील जनतेला कोरोना संसर्गाच्या भीतीने घराबाहेर पडणे अशक्य झाले असल्याने शेतकरी वर्गसह मजूर वर्गावर आर्थिक संकट कोसळले आहे. गर्दीला आळा घालण्यासाठी घाऊक बाजारपेठा व तालुक्यातील आठवडी बाजार बंद केल्यामुळे पिकवलेला भाजीपाला विकायचा कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. लॉकडाउनने भाजीपाल्याचे भाव कमी झाल्याने आता पोल्ट्री व्यावसायिकांप्रमाणेच भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
तालुक्यात उन्हाळी धान शेतीबरोबर भाजीपाल्याचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. टोमॅटो, मिरची, कारली, वांगी, काकडी विविध पीके शेतकरी घेतात. भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल यासाठी शेतकऱ्यांनी उसनवार करीत भाजीपाला लागवड केली. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा झाला नाही. पण यावर्षी भातशेती तोट्यात आल्याने भाजी पिकातून काही हाती येईल या आशेवर शेतकरी वर्गाने या वर्षी मोठा खर्च करून भाजीपाल्याची लागवड केली होती. संचारबंदी सुरू असताना घराच्या बाहेर पडणे अशक्य झाल्याने शेतावर जाणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागात ७० टक्के शेतकऱ्यांना कोरोना बंदीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. एकीकडे वीज पुरवठा रात्रीच्या वेळी सुरू आहे तर दुसरीकडे शेतीची कामे लांबणीवर जात असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शेतातील उन्हाळी धान पिकाची निंदण करण्यासाठी जाणाऱ्या मजूर लोकांना आता पाच पेक्ष्या जास्त मजूर घेवून शेतावर जाता येत नाही. बी बियाणे, खते, औषधे व मजुरी महागली आहे. यावर्षी ढगाळ हवामानामुळे शेतीच्या खर्चात दुप्पटीने वाढ झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली असली तरी बाजारात मागणी नसल्याने रस्त्यावर भाजीपाला फेकण्याची वेळ आल्याचे अनेकांनी सांगितले. भाजीपाला पीकावर कोरोना व्हायसरचा प्रादुर्भाव झाल्याने परदेशात जाणारा माल बंद करण्यात आला आहे. टोमॅटोचे दरही कमी झाले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलत घाऊक बाजारपेठा व आठवडे बाजार बंद केल्याने आता हातात आलेल्या धान पिकांचे करायचे काय, हा प्रश्न त्याच्यासमोर आहे. त्यामुळे आता शेतकºयावर कोरोनाचा फटका बसला आहे.

शेतकऱ्याना आर्थिक फटका
शहराजवळील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी आणतात. मात्र जागतिक स्तरावर कोरोनाचा होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणासह आठवडी बाजारावर बंदी आणली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या काढणीवर आलेला भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान होत आहे. भाजीपाला पीक कमी वेळात होणार असल्यामुळे तो वेळेवर काढून वेळेवर मार्केटमध्ये पोहोचण्याची धडपड शेतकºयांमध्ये असते. मात्र शहरातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. एकतर संचारबंदीमुळे घराबाहेर पडणे बंद आहे. त्यामुळे रोजगार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

Web Title: Corona's bowl on vegetable growing farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.