जिल्ह्यात एक लाख २३ हजार व्यक्तींना कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST2021-04-03T04:31:32+5:302021-04-03T04:31:32+5:30

जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनामुक्त मोहिमेसाठी लसीकरण हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील १६८ केंद्रांवर कोरोनाची लस दिली जात आहे. जिल्हा ...

Corona vaccine to one lakh 23 thousand people in the district | जिल्ह्यात एक लाख २३ हजार व्यक्तींना कोरोना लस

जिल्ह्यात एक लाख २३ हजार व्यक्तींना कोरोना लस

जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनामुक्त मोहिमेसाठी लसीकरण हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील १६८ केंद्रांवर कोरोनाची लस दिली जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र आणि काही खासगी रुग्णालयांतही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बॉक्स

४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण

सुरुवातीला ६० वर्षांवरील सर्व व्यक्ती आणि ४५ वर्षांवरील अति जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना लस दिली जात होती. मात्र १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. १ एप्रिल रोजी जिल्ह्यात १० हजार ६४५ व्यक्तींना लस देण्यात आली. त्यात १० हजार ३२१ व्यक्ती प्रथम डोस घेणाऱ्या आहेत. जिल्ह्यात कोरोना लसींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी कोरोना लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Corona vaccine to one lakh 23 thousand people in the district