जवाहरनगर : जवाहनगर परिसरात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मागील दिवसात दोन ते तीन रुग्ण दगावले. परिणामी जिल्हा आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र परसोडी येथे युद्धपातळीवर लसीकरण करण्यात सुरुवात झाली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, महाराष्ट्र व केंद्र शासनातर्फे लसीकरण करण्यात सर्वाधिक भर दिला. त्या अनुषंगाने गावपातळीवरील आशा वर्कर यांना वयोगटानुसार व अति जोखमीचे व्यक्तीस शोध मोहीम राबवून, त्यात त्यांचे लसीकरण करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगाने प्रथम साठ वयोगटातील व अति जोखमी यात रक्तदाब, शुगर यांना कोव्हॅक्सिन ९५० व्यक्तींना देण्यात आले. यात स्वच्छेने लसीकरण करण्यास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आणि आता एक एप्रिलपासून शासनाद्वारे घोषित ४५ वयोगटातील वरील सर्व नागरिकांना कोविशिल्ड देण्यात सुरुवात झाली आहे. नागरिक स्वतःहून आपापल्या वाहनाद्वारे परसोडी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथे लसीकरण करून घेत आहेत. यात याही गटातील नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन समुवदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर चित्रा जवंजाळ यांनी केले. या लसीकरण करण्यात आरोग्य सेविका यु. बी. देवतळे, डी.डी. साकुरे, एमपीडब्ल्यू वर्कर मंगेश वासनिक, सविता हटवार, आशा वर्कर माधुरी डोंगरे, चंद्रकला हटवार, कविता हटवार, गटप्रवर्तक वर्षा जीभकाटे, अश्विनी बांगर व उपकेंद्रातील सर्व आशा वर्कर यांनी सहकार्य केले.
परसोडी उपकेंद्रात कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:36 IST