लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिलह्यात गत काही दिवसात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून बुधवारी जिल्ह्यात ३८३ ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यात सर्वाधिक भंडारा तालुक्यातील २३९ ॲक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, बुधवारी ३७ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून २२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर मंद असला तरी गत १५ दिवसांपासून ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. महिनाभरापूर्वी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०० च्या आत आली होती. मात्र आता कोरोना रुग्णांच्या संख्येत काही अंशी वाढ होत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णही वाढत आहे. सध्या ३८३ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यात भंडारा २३९, मोहाडी १४, तुमसर ५५, पवनी २१, लाखनी ३५, साकोली १३ लाखांदूर सहा अशा ॲक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे.बुधवारी १०८२ व्यक्तींच्या घश्यातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यात १६, तुमसर ११, लाखनी चार, पवनी आणि मोहाडी येथे प्रत्येकी दोन तर साकोली आणि लाखांदूर येथे प्रत्येकी एक असे एकूण ३७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १४ हजार ५७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यापैकी १३ हजार ३४७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली तर ३२७ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. भंडारा याला अपवाद असला तरी नागरिकांच्या बेजबाबदार वागण्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणे, फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे, कोरोना चाचणी करून घेण्यास नागरिकांची उदासीनता दिसून येत आहे. प्रशासनाच्यावतीने विविध उपाय योजने जात असले तरी नागरिकांकडून मात्र हवे ते सहकार्य मिळत नाही.