शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांना सुरक्षा साहित्य खरेदी करावे लागते स्वखर्चातून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 13:59 IST

Bhandara : सुरक्षा साधनांच्या गुणवत्तेकडे सर्वांचेच दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : चिखला भूमिगत खाणीत काम कारणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या सुरक्षित व दर्जेदार साहित्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. येथे धोक्याची शक्यता असल्याने खाण प्रशासन आपल्या कामगारांना दर्जेदार सुरक्षा साहित्य पुरविते. तर दुसरीकडे कंत्राटदारांचे सुमारे साडेपाचशे कामगारांना स्वखर्चाने बाजारातून सुरक्षा साहित्य खरेदी करण्यास सांगते.

चिखला भूमिगत खाणीत खान प्रशासनाचे नियमित ५५० आहेत. तर कंत्राटदार कामगारांची संख्या सुमारे ५५० ते ६०० असल्याची माहिती आहे. कंत्राटदारांच्या कामगारांना सुरक्षा साहित्य मात्र बाजारातून खरेदी करावे लागत. त्यामुळे या साहित्याच्या गुणात्मक व दर्जात्मक बाबीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खाण शासनाने येथे कंत्राटदराला सुरक्षा साहित्य पुरविण्याची गरज आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खाण प्रशासन कोणतीही तपासणी करीत नसल्याची माहिती आहे.

नियमित व कंत्राटदार कामगारांची संख्या सारखीभारत सरकारचा उपक्रम असलेली चिखला खाण ही जगप्रसिद्ध खान असून, हॉलंडनंतर जगात या खाणीच्या दुसरा क्रमांक लागतो; परंतु या खाणीत केंद्रीय इस्पात मंत्रालय नियमित कामगारांची भरती करीत नाही. ब्रिटिश काळापासून जुने धोरण व नियम येथे सुरू आहे. त्यामुळे सुरक्षेअभावी येथील कामगारांच्या जीवाला धोका आहे. परिसरात हाताला काम नसल्याने जे काम मिळेल ती कामे येथील स्थानिक मजूर करतात. कंत्राटदार कामगारांना निम्मी मजुरी देतात, तरीही त्याविरुद्ध कोणीच आवाज उठवत नाही. विरोध केला तर कामावरून बंद केले जात असल्याने सर्वजण मुकाट्याने काम करता असतात.

अपघात पाहून अधिकाऱ्याचाच गेला होता प्राण१९९३ मध्ये चिखला खाणीत एका कामगाराचा दगडाखाली येऊन तो चिरडला गेला होता. या अपघातानंतर चिखला खाणीचे सहायक व्यवस्थापक हलोडे, खाणीतील अभियंते व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी पाहणीकरिता गेले होते. दरम्यान, त्यांच्यासमोरच मोठा दगड हटविताना त्या दगडाखाली कामगार चिरडला होता. त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. हे दृश्य पाहताच सहायक व्यवस्थापक हलोडे यांना हृदयविकाराच्या तीव्र धक्का बसला. खाणीतच कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता.

कामगार युनियनच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हचिखला येथील खाणीत केंद्रीय स्तरावरची कामगार युनियन येथे कार्यरत आहे: परंतु नियमित कामगारांच्या समस्यांकडेच ही युनियन लक्ष देते. कंत्राटी कामगार वाऱ्यावर आहेत. कंत्राटदारांची युनियन येथे तेवढी मजबूत नाही, तीसुद्धा कंत्राटदाराच्या दबावात असते, परिणामतः कामगारांच्या समस्या मांडल्या जातच नाहीत. 

टॅग्स :bhandara-acभंडारा