कोका ते पलाडी रस्ता रात्री दहापर्यंत सुरु ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:34 AM2021-04-06T04:34:06+5:302021-04-06T04:34:06+5:30

मौजा कोका येथे वन विभागाचे विश्राम गृह तसेच अत्याधुनिक सुविधांनी युक्त आसाम पॅटर्नचे बांबू हट व डारमेंटरी हॉल आहे. ...

Continue the Koka to Paladi road till 10 pm | कोका ते पलाडी रस्ता रात्री दहापर्यंत सुरु ठेवा

कोका ते पलाडी रस्ता रात्री दहापर्यंत सुरु ठेवा

googlenewsNext

मौजा कोका येथे वन विभागाचे विश्राम गृह तसेच अत्याधुनिक सुविधांनी युक्त आसाम पॅटर्नचे बांबू हट व डारमेंटरी हॉल आहे. वन्यजीव विभागामार्फत संचालित येथील वनात सफारी करून कोका येथे येऊन पर्यटक मुक्कामी राहतात. कोका येथे राहण्याची सोय आहे. पण जेवणाची व्यवस्था नाही. त्यामुळे पर्यटक मौजा चंद्रपूर येथे (कोकावरुन ६ किलोमीटर अंतरावर) राहण्याची व जेवणाची सोय असल्याने तिथे जातात.

परंतु परतीच्या वेळेस कोका ते पलाडीपर्यंत रस्ता सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु असल्याने कोका, नवेगाव, सर्पवाडा, चंद्रपूर, दुधारा, इंजेवाडा गावातील लोकांना अडचणीचा सामना करावा लागतो. रात्री बेरात्री आरोग्य बिघडले तर दवाखान्यात जाण्याकरिता या मार्गावर जाण्या - येण्यास अडचणी निर्माण होतात. प्रसंगी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पर्यटकांना फार त्रास सहन करावा लागतो.

परिणामी सदर रस्ता रात्री दहा वाजेपर्यंत सुरु करण्यात यावा, तसेच मौजा कोका वन विश्रामगृह परिसरात राहण्याची सोय आहे जेवणाची सोय नसल्यामुळे कोका वनविश्राम गृह येथे किचन रुम किंवा जेवणाच्या व्यवस्थेकरिता एक खोली जिल्हा पर्यटक निधी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात यावी. जेणेकरुन पर्यटकास दोन्ही सोयी उपलब्ध होतील. तसेच पर्यटकांना त्रास सहन करावा लागणार नाही, अशी मागणी कोका येथील सरपंच सरिता कोडवते, उपसरपंच शहारे, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय कोडवते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उत्तम कळपाते, रवींद्र तिडके, तंमुस अध्यक्ष तुकाराम हातझाडे व ग्रामस्थांनी आ. नरेंद्र भोंडेकर तसेच वनाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Web Title: Continue the Koka to Paladi road till 10 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.