शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरने दुचाकीस्वार विवाहतेला चिरडले: भंडारा पाेलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 18:58 IST

जिल्हा परिषद चौकातील घटना

देवानंद नंदेश्वर

भंडारा : गणेशपूर येथील तेलमासरे दाम्पत्य दुचाकीने स्वगृही जात असताना मागेहून येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली. यात ४८ वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी एक वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील भंडारा जिल्हा परिषद चौकानजिकच्या प्रवासी निवाऱ्यासमोर घडली.

वंदना चंदूलाल तेलमासरे (४८) रा. गणेशपूर, असे मृत महिलेचे नाव आहे. चंदूलाल तेलमासरे व त्यांची पत्नी वंदना दुचाकी क्रमांक एमएच ४० व्ही ४३६० ने जिल्हा परिषद चौकातून पटवारी भवनाकडे जात होते. दरम्यान जिल्हा परिषद चौकानजिकच्या प्रवासी निवाऱ्याजवळ कंटेनर क्रमांक एमएच ०४ एलई ०७८० ने दुचाकीला मागेहून जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील वंदना तेलमासरे कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांची घटनास्थळी प्राणज्योत मालवली.

घटनेची माहिती भंडारा पोलिसांना होताच सहाय्यक पोलिस निरिक्षक धनंजय पाटील, हवालदार आशिष तुमाने, िशिपाई विठ्ठल हेडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती गणेशपूर येथे होताच घटनास्थळावर नागरिकांची गर्दी झाली होती. मृत वंदना तेलमासरे यांच्या मागे पती, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी केली असून कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडारा