शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST

सिहोरा परिसरातील चुल्हाड गावात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावात आरोग्य उपकेंद्र संचालित करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या उपकेंद्रातील नुतनीकरण करण्यास सुरुवात केली आहे. निविदा अंतर्गत एका कंत्राटदाराला ही संपुर्ण कामे देण्यात आली आहेत.

ठळक मुद्देकंत्राटदाराचा पोबारा : सरपंचाची तक्रार, हरदोली येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : प्राथमिक आरोग्य केंद्र चुल्हाड अंतर्गत हरदोली गावातील आरोग्य उपकेंद्राचे अर्धवट बांधकाम सोडून कंत्राटदारांनी साहित्याची उचल केली आहे. या संदर्भात मुख्य कार्यपालन अधिकारी याच्याकडे सरपंच नितीन गणविर यांनी तक्रार केली आहे.सिहोरा परिसरातील चुल्हाड गावात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावात आरोग्य उपकेंद्र संचालित करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या उपकेंद्रातील नुतनीकरण करण्यास सुरुवात केली आहे. निविदा अंतर्गत एका कंत्राटदाराला ही संपुर्ण कामे देण्यात आली आहेत. आरोग्य उपकेंद्रात जुन्याच कामांना तोडून नविनीकरण करण्याचे प्रयत्न करण्यात आल्याने मार्च महिन्यात सरपंचानी विरोध केला होता. आरोग्य उपकेंद्र व प्रसुती कक्ष दर्जेदार असताना पुन्हा त्याच कामांना मंजुरी देण्यात आल्याने सरपंच आणि कार्यरत कर्मचाऱ्यांच्या भुवया उंचाविल्या होत्या. आरोग्य उपकेंद्रात अनेक साहित्यांचा अभाव असतांना त्या सोडविल्या जात नाहीत. यामुळे ग्रामीण महिलांना सेवा मिळताना अडचणीचे ठरत आहे. पंरतु वातानुखोलीत बसुन वरिष्ठ अधिकारी अंदाजपत्रक तयार करतात.निधी लाटण्याचा आरोप करीत हा प्रकार जिल्हा परिषद सदस्या प्रमिला कटरे यांनी जिल्हा परिषद सभागृहात मांडला होता. या विषयावर वादग्रस्त चर्चाही झाली होती. यानंतर आरोग्य विभागाचे उपविभागीय अभियंता लेदे यांनी प्रत्यक्ष हरदोली गावातील आरोग्य उपकेंद्रांनी भेट देवून पाहणी केली होती. उपकेंद्राचे कामे करतांना गावातील सरपंच आणि आरोग्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. असा ठपका ठेवण्यात आला होता. यावेळी उपविभागीय अभियंता लेदे यांनी सरपंच व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेवून कामे करण्याचा सुचना दिल्या होत्या. परंतु कामे करतांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. या शिवाय आरोग्य उपकेंद्राचे कामे पुर्ण करण्यात आली नाही. रंगरंगोटी करण्यात आली नाही ही सर्व कामे सोडून कंत्राटदाराने साहित्यासह पोबारा केला आहे.साहित्य नेत असतांना अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु कामे पुर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गावात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान सरपंच नितीन गणविर यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना तक्रार केली असतानाही आजपर्यंत या तक्रारीची दखलही घेण्यात आली नाही. या परिसरातील मोहाडी (खापा) गावातील आरोग्य उपकेंद्राचे अशीच अवस्था झाली आहे. विकास कार्यात गोंधळ सुरु असल्याची तक्रार सरपंच सुनिल माने यांनी सुध्दा दिली होती. परंतु यंत्रणा या तक्रारींवर गंभीर असल्याचे दिसत नाही. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा करिता नागरिक त्रस्त झाले असताना यंत्रणा बोजवारा करीत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.हरदोली आरोग्य उपकेंद्रात अर्धवट बांधकाम सोडून कंत्राटदाराने साहित्यासह पोबारा केला आहे. या आशयाची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकारी यांना चौकशी व कारवाई करिता तक्रार दिली आहे. मात्र दुर्लक्ष होत आहे.- नितीन गणविर,सरपंच हरदोली

टॅग्स :Socialसामाजिक