शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलांसाठी वाळूचा ठणठणाट, डेपो बंदमुळे बांधकाम ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 13:29 IST

लाभार्थ्यांची फरफट : महसूल व खनिकर्म विभाग लक्ष देणार काय ?

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात गतवर्षी २५ शासकीय वाळू डेपोंना पर्यावरण विभागासह शासनाची परवानगी मिळाली होती. त्यापैकी १९ वाळू डेपो सुरू करण्यात आले होते. सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात केवळ ११ डेपो सुरू असून ८ बंद आहेत. त्यातच रेतीचा चोरटा व्यापार पूर्णतः बंद पडला आहे. वाळूअभावी घरकुलांचे बांधकाम प्रभावित झाले आहेत. लाभार्थ्यांकडे वाळूचा साठा नसल्याने बांधकामे बंद आहेत. महसूल व जिल्हा खनिकर्म विभाग याकडे लक्ष देणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे. जिल्ह्यात कधी नव्हे अशी वाळू टंचाई सर्वत्र जाणवत आहे. 

घरकुल लाभार्थ्यांना स्वस्तात मिळणारी वाळू महागली असून कुठेही मिळेनाशी झाली आहे. शासकीय वाळू डेपोत अधिकचा वाळू साठा उपलब्ध असताना कमी साठा असल्याचे भासविले जात आहे. त्यातच शासकीय वाळू डेपो सुरू असलेल्या ठिकाणांवरून घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळेनाशी झाली आहे. वाळू अभावी हाहाकार उडाला असून अनेकांच्या घरकुलाचे बांधकाम बंद पडले आहेत. त्यामुळे बांधकाम पूर्ण करायचे कसे, असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांकडून विचारला जात आहे.

बंद असलेले शासकीय वाळू डेपो पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यात १९ शासकीय वाळू डेपो सुरू होती. परंतु, पूरपरिस्थिती व अन्य कारणांनी जिल्ह्यातील ८ वाळू डेपो बंद पडले आहेत. बंद पडलेल्या डेपोंमध्ये चारगाव, निलज बुज, कान्हळगाव, मुंढरी बुज, गुडेगाव, बेलगाव, कोथुर्णा, मोहरना आदींचा समावेश आहे.

मोहाडी तालुक्यात परिस्थिती बिकट मोहाडी तालुक्यात सद्यस्थितीत वाळूची तीव्र टंचाई आहे. तालुक्यात मोहगाव देवी येथील शासकीय वाळू डेपो वगळता निलज बुज, कान्हळगाव, मुंढरी बुज आदी डेपो बंद असल्याने घरकुल लाभार्थ्यांची धावपळ होत आहे. वाळूअभावी बांधकामे बंद पडली आहेत.

तातडीने डेपो सुरू करण्याची अपेक्षाजिल्ह्यात रेतीचा चोरटा व्यापार बंद पडला आहे. त्यातच मोहाडी तालुक्यात शासकीय वाळू डेपो मोठ्या प्रमाणात बंद आहेत. घरकुलांचे बांधकाम वेळेत पूर्ण होण्यासाठी तालुक्यातील बंद असलेले डेपो तातडीने सुरू करण्याची अपेक्षा घरकुल लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

सुरु असलेले शासकीय वाळू डेपो 

  • जिल्ह्यात सद्यस्थितीत १९ पैकी ११ शासकीय वाळू डेपो सुरु आहेत. सुरू असलेल्या वाळू डेपोंमध्ये लोभी, सोंड्या, मांडवी, आष्टी, मोहगाव देवी, फुलमारा, अंतरगाव, पळसगाव, वाकल, परसोडी व खंडाळा आदींचा समावेश आहे.
  • नदीत पाणी असल्याने वाळू उपसा त्याप्रमाणात होत नाही. मग ही सर्व रेती डम्पिंग केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रेती डम्पिंग झाली केव्हा? 

घरकुलांसाठी १५ टक्के स्टॉक राखीव प्रत्येक शासकीय वाळू डेपोवर घरकुल लाभार्थ्यांसाठी १५ टक्के स्टॉक राखीव असल्याचे प्रशासना- कडून सांगितले जाते. परंतु, वाळू डेपो चालकांकडून तसेच प्रशासना- कडून घरकुल लाभार्थ्यांना वाळू, उपलब्ध केली जात नाही, ही शोकांतिका आहे. घरकुल लाभार्थ्यांत वाळूसाठी आक्रोश व्यक्त होत आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा