लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न भंडारा शहरातील मेंढा परिसरात प्राचीन गिरी गोसावी यांचे अत्यंत कलात्मक व सुंदर मठ आणि मंदिर समूह आहेत. विष्णू भगवान, भगवान गणेश आणि विठ्ठल रखुमाईसह अनेक संतांच्या मूर्ती आहेत. भंडारा शहराच्या वैभवात भर पाडणारे हे वास्तूशिल्प ८०० वर्ष प्राचीन असून हेमाडपंती वास्तूशैलीने बांधलेले आहे. या मंदिर समूहाचे संवर्धक होण्याची आता गरज आहे.आद्य शंकराचार्यांनी गोसावी समाजाची स्थापना केली आणि समाजाचा विस्तार केला असे सांगितले जाते. शंकराचार्यांनी चारही दिशांना दहा शिष्य बनविले. त्यांनी मठ, मठी स्थापन केल्या. त्यापैकी भंडारा येथील मेंढा परिसरातील गिरी गोसावी समाजाचा मठ व मंदिर समूह होय. येथील वास्तू ८०० वर्ष जूनी असून हेमाडपंती वास्तूशैलीनुसार चार मंदिरांचा समूह तयार केलेला आहे.कालांतराने या मंदिरात पुजारी व रक्षक म्हणून गिरीपंथातील गोसावी राहू लागले. येथे मठाची स्थापना झाली. महंत, साधू, सन्याशी असलेले दिवंगत झाले. बाबा चतुर्नाथगिरी महाराज, छत्तरगिरी महाराज, अलोनीबाबा, सूरजगिरी महाराज, गोविंद गिरीमहाराज, शंकरगिरीमहाराज यांचे येथे स्मारक बांधण्यात आले.अलोनीबाबा विषयी राजे रघुजी भोसले यांची विशेष श्रद्धा होती. ते दर्शनासाठी भंडारा येथे यायचे. सहाव्या पिढीपर्यंत येथे कुणीच महिला नव्हती. सातव्या पिढीपासून मठात स्त्रीयांचा समावेश झाला. नवव्या पिढीतील गजानन गिरी व नंतर दहाव्या पिढीतील किशोर गिरी हे सध्या मंदिराची देखभाल करीत आहेत.मंदिराच्या देखभालीसाठी २००७ साली ट्रस्ट स्थापन करण्यात आले. मंदिरात अनेक ठिकाणी अतीप्राचीन गणेशाची विविध रुपे मूर्तीच्या स्वरुपात आहेत. तसेच पशूपक्षी, राक्षसे, पुष्प व सुंदर नक्षीकाम केलेले स्मारके विलोभनीय आहेत. आता प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.विकास कामे रखडलीट्रस्टच्या वतीने या स्थळाचा विकास करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. अखेर शासनाकडून राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाला. संरक्षक भिंत व इतर कामासाठी शासनाकडून ७३ लाख रुपये मंजूर होऊन सुरक्षा भिंतीचे काम करण्यात आले. परंतु पुढे सौंदर्यीकरणासाठी निधी प्राप्त न झाल्याने विकास कामे रखडली आहेत.भंडारा शहराचा संपन्न वारसा सांगणाऱ्या या वास्तूची जतन होण्याची गरज आहे. ट्रस्टतर्फे प्रयत्न सुरु आहेत. परंतु हवा तसा निधी अद्यापही मिळाला नाही. या परिसराचा विकास झाल्यास हे स्थळ नावारुपाला येईल यात शंका नाही.मो.सईद शेख, अध्यक्ष ग्रीन हेरिटेज, भंडारा.
गोसावी मठ व मंदिरांचे संवर्धन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST
कालांतराने या मंदिरात पुजारी व रक्षक म्हणून गिरीपंथातील गोसावी राहू लागले. येथे मठाची स्थापना झाली. महंत, साधू, सन्याशी असलेले दिवंगत झाले. बाबा चतुर्नाथगिरी महाराज, छत्तरगिरी महाराज, अलोनीबाबा, सूरजगिरी महाराज, गोविंद गिरीमहाराज, शंकरगिरीमहाराज यांचे येथे स्मारक बांधण्यात आले.
गोसावी मठ व मंदिरांचे संवर्धन आवश्यक
ठळक मुद्दे८०० वर्ष जूनी वास्तू । हेमाडपंथी वास्तूकलेतील चार मंदिरांचा समूह