लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट तुर डाळीचे वितरण होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले. त्यावरून संबंधित विभाग खळबडून जागा झाला. या वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र राज्य को आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाºयांनी मोहाडी येथे येऊन सर्व रास्त भाव दुकानदारांची चौकशी केली. तसेच सर्व निकृष्ट तुरडाळीचे पॉकीट सिलबंद केले.मोहाडी येथील स्वस्त धान्य दुकानात सीलबंद तुर डाळ निकृष्ट आणि सडलेली असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून अन्न व पुरवठा विभागाकडे तक्रार केली. तुरीचे पाकीट तात्काळ बदलून देण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली. या संदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच अधिकाºयांमध्ये खळबळ उडाली. मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी अजय बिसने लेखापाल महेंद्र हेडाऊ, अन्न पुरवठा अधिकारी सागर बावरे यांनी मोहाडी येथे जाऊन दुकानांची तपासणी केली. त्यावेळी त्यांनी तूर डाळीचे पॉकीट जप्त करून सील केले. आता या प्रकरणी चौकशी होऊन यात दोषी असणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे.
स्वस्त धान्य दुकानातील तूर डाळ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 21:48 IST
स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट तुर डाळीचे वितरण होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले. त्यावरून संबंधित विभाग खळबडून जागा झाला. या वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र राज्य को आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाºयांनी मोहाडी येथे येऊन सर्व रास्त भाव दुकानदारांची चौकशी केली. तसेच सर्व निकृष्ट तुरडाळीचे पॉकीट सिलबंद केले.
स्वस्त धान्य दुकानातील तूर डाळ जप्त
ठळक मुद्देमोहाडी येथे चौकशी : मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांची कारवाई