शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सरकारबाबत भंडारा जिल्ह्यात उमटल्या संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:22 IST

भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यामुळे जनतेच्या आकांक्षा पूर्ण होण्याकडे राज्य वाटचाल करेल, हा विश्वास असल्याचे भंडारा जिल्हा भाजप महामंत्री मुकेश थानथराटे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सध्या महाराष्ट्रात विकासाच्या अनेक योजना सुरु आहेत. अशा सर्व योजना सुरु राहण्याकरिता महाराष्ट्रात पुन: भाजप सरकार स्थापित होणे आवश्यक होते. तसेच जनतेचा कल देखील भाजप शासन करीतच आहे. भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यामुळे जनतेच्या आकांक्षा पूर्ण होण्याकडे राज्य वाटचाल करेल, हा विश्वास असल्याचे भंडारा जिल्हा भाजप महामंत्री मुकेश थानथराटे यांनी सांगितले.महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील काळा दिवस - आमदार नाना पटोलेसरकार स्थापनेची आजची प्रक्रिया घटना विरोधी आहे. महाराष्ट्राच्या राजकीय लौकिकाला हा कलंक असून राज्याच्या राजकीय इतिहासातील काळा दिवसच म्हणावा लागेल. केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक कधी झाली. राष्ट्रपतींकडे केव्हा शिफारस केली आणि राष्ट्रपती राजवट कधी संपली हे अनाकलनीय आहे. आता विश्वासदर्शक ठराव भाजपने बहुमत सिद्ध करुन दाखवावा, असे साकोलीचे काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी सांगितले.लोकांच्या मनातील सरकार - खासदार सुनील मेंढेनिवडणुकीपूर्वी भाजप- शिवसेना युती झाली होती. जनतेने युतीला मतदान केले. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असे वारंवार सांगितले. जनतेने युतीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र शिवसेना लोकभावनेच्या विरोधात गेली. आता जनतेच्या मनातील सरकार महाराष्ट्रात आले. शेतकरी हिताच्या सरकारमुळे महाराष्ट्राची प्रगती होणार यात शंका नाही, असे भंडारा- गोदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले