दिलासा ! १४२७ व्यक्तींची कोरोनावर यशस्वी मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:36 AM2021-04-22T04:36:46+5:302021-04-22T04:36:46+5:30

भंडारा : कोरोना संसर्गाने सर्वच जण भयभीत झाले असताना बुधवाी भंडारा जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला. तब्बल १४२७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी ...

Comfort! 1427 people successfully defeated Corona | दिलासा ! १४२७ व्यक्तींची कोरोनावर यशस्वी मात

दिलासा ! १४२७ व्यक्तींची कोरोनावर यशस्वी मात

Next

भंडारा : कोरोना संसर्गाने सर्वच जण भयभीत झाले असताना बुधवाी भंडारा जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला. तब्बल १४२७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. ठणठणीत बरे होऊन ही मंडळी घरी पोहोचली. गत तीन दिवसांपासून ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट आली असून, पाॅझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.

गत २० दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दररोज हजार ते १२०० पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही १३ हजारांपर्यंत पोहोचली होती. मृत्यूचा आकडाही वाढत होता; परंतु गत तीन दिवसांपासून थोडे दिलासादायक वातावरण तयार झाले आहे. बुधवारी तब्बल १४२७ व्यक्तींनी कोरोनावर मत केली. मंगळवारी ९७०, तर सोमवारी १२०७ व्यक्तींनी कोरोनावर मात केली होती. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाण दिलासा देणारे ठरत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७ हजार ७९७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यात भंडारा तालुक्यातील ११ हजार ५९३, मोहाडी २४४१, तुमसर ३६५९, पवनी ३२७३, लाखनी ३००९, साकोली २६२० आणि लाखांदूर तालुक्यात १२०२ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.

जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे. बुधवारी जिल्ह्यात १२ हजार ८९ ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली, तर मंगळवारी १२ हजार ३१८ आणि सोमवारी १२ हजार ४५२ ॲक्टिव्ह रुग्ण होते. दररोज बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. जिल्हा रुग्णालयासह विविध शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जात असून, अनेक रुग्ण गृहविलगीकरणातही आहेत.

बाॅक्स

१८ जणांचा मृत्यू, १२१६ पाॅझिटिव्ह

जिल्ह्यात बुधवारी १८ जणांचा मृत्यू, तर १२१६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यात १०, पवनी ३, तुमसर २ आणि मोहाडी, लाखनी व साकोली येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला, तर भंडारा तालुक्यात ५५१, मोहाडी ५०, तुमसर १७७, पवनी ९२, लाखनी १५२, साकोली १२८ आणि लाखांदूर तालुक्यात ६६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६२८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, ४० हजार ५१४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती.

Web Title: Comfort! 1427 people successfully defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.