शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

कलर्स, लोकमतच्या लावणीत दिसले एक वेगळेच गठबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 9:23 PM

आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पै-पाहुणे, नौकरी, व्यवसाय यात दिवस कसा सरतो तिचे तिलाच समजत नाही. अशा तिच्या धावपळीच्या जीवनात थोडा विसावा, मनोरंजनाची संधी द्यावी म्हणून मराठी कलेचे अविभाज्य अंग असलेल्या लावणी कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने लोकमत सखी मंच व कलर्स वाहिनी यांच्या वतीने शुक्रवारी ११ जानेवारीला येथील मंगलम् लॉन येथे 'अप्सरा आली' या लावणी शोचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देमनोरंजनाची मेजवानी : लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत यांच्या खणखणीत लावण्याचा धडाका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पै-पाहुणे, नौकरी, व्यवसाय यात दिवस कसा सरतो तिचे तिलाच समजत नाही. अशा तिच्या धावपळीच्या जीवनात थोडा विसावा, मनोरंजनाची संधी द्यावी म्हणून मराठी कलेचे अविभाज्य अंग असलेल्या लावणी कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने लोकमत सखी मंच व कलर्स वाहिनी यांच्या वतीने शुक्रवारी ११ जानेवारीला येथील मंगलम् लॉन येथे 'अप्सरा आली' या लावणी शोचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात नगरसेवक संजय कुंभलकर व पूजा कुंभलकर यांच्या हस्ते उद्घाटन दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले. यावेळी लोकमतचे शाखा व्यवस्थापक मोहन धवड, बाळकृष्ण घाटबांधे, नगरसेविका जयश्री बोरकर, अरविंद लांजेवार उपस्थित होते. अप्सरा आली या लावणीद्वारे अनेक नृत्यांगणासह बहारदार लावणीचे आयोजन करण्यात आले. गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली असून नक सोडून जाऊ रंग महाल या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यादरम्यान एकाहून एक सरस अशा बहारदार लावण्यांचे सादरीकरण करण्यात आले. या लावण्य तारकांनी एकाहून एक खणखणीत लावण्यांचा धडाका करतानाच सखी मंच सदस्यांना आपल्यासह नाचायला लावले. यावेळी विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर विजेता स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. संचालन ललीत घाटबांधे यांनी तर आभार सीमा नंदनवार यांनी मानले.मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रम देऊन लहान पडद्यावर आपल्या नावाच्या रंगाची सप्तरंगी उधळण करणारे एकमेव चॅनल म्हणजे कलर्स चॅनल. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनेचे रंग टिपून त्या भावनेचे एक वेगळ्या रंगात सिरियल्सद्वारे सादरीकरण करून कलर्स चॅनलने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.पुन्हा एकदा एक नवी प्रेमकथा ‘गठबंधन’ ही मालिका कलर्स चॅनलवर १५ जानेवारीपासून प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रदर्शित होणार आहे. ही कथा महाराष्ट्रातल्या डोंबीवलीत राहणाऱ्या व गुंडगिरी करणाऱ्या २४ वर्षीय रघुभाऊ व आयपीएस अधिकारी होण्याची स्वप्नं बाळगणाऱ्या निर्भीड, दृढ आणि महत्त्वाकांक्षी अशा गुजरातमधील धनक या तरुणीची. बऱ्याचदा अनपेक्षित आणि अनोळखी ठिकाणी सापडणाºया प्रेमात आपणाला कधीही उणीव किंवा त्रुटी भासत नाही. रघुभाऊ हा जाधव घराण्यातील मुलगा दहावी पास झालेला असतो.आई सावित्रीबाईच्या सावकारी व खंडणी व्यवसायात तो मदत करत असताना ‘जिओ लाईफ तो अपुन के स्टाईल में..’ असे म्हणत तो जीवन जगत असतो. त्याचा प्रेमावर विश्वास नसतो. कारण प्रेम आपल्याला कमकुवत आणि दुर्बळ बनविते, असे त्याला वाटते. त्यामुळे तो प्रेमाचा नेहमीच द्वेष करतो. एकिकडे गुजरातमध्ये राहणारी २३ वर्षीय मुलगी धनक ही आयपीएस अधिकारी बनण्याची महत्त्वाकांक्षा ठेवत असतानाच आपल्याला हवे ते मिळाले पाहिजे, त्यासाठी तिची कठोर परिश्रम करण्याची तयारी असते.कालांतराने ती मुंबईला जाते. तिथे तिला रघु भेटतो व तिला पाहताच त्याला ती आवडते. आणि यासाठी तिच्यासोबत मैत्री करण्याची आपल्या मित्रासोबत पैजही लावतो. याच मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमामध्ये होते. या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रेमाचं एक आगळं-वेगळं रसायन पाहायला मिळतं. एक गुंड व आयपीएस अधिकाºयाची ही कथा म्हणजेच ‘गठबंधन’ १५ जानेवारीपासून प्रत्येक सोमवारी ते शुक्रवारी रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.विजेत्या स्पर्धक :स्वाती सेलोकर, माया नशिने, मनिषा रक्षीये, अंजली घाटबांधे, चित्रा झुरमुरे, कविता चौधरी, विना गायधने, प्रियंका कुथे, स्रेहा हटवार, सीमा खोब्रागडे.