१५ जोडप्यांचे शुभमंगल : गराडा येथे उसळली वऱ्हाड्यांची गर्दीलाखनी : तालुक्यातील गराडा येथे आदिवासी गोंड समाजबांधवांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोहळ्यात १५ जोडप्यांचा विवाह पार पडला.सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या वंदना पंधरे यांनी केले. अध्यक्षस्थानी पं.स. सभापती रजनी आत्राम उपस्थित होत्या. अतिथी म्हणून माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी आमदार सेवक वाघाये, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गणपतराव मडावी, अजाबराव चिचामे, नरहरी वरकडे, कृषी अधिकारी धनराज तुमडाम, भाऊराव कुंभरे, बिसन सयाम, माजी सभापती नामदेव वरठे, डॉ. नाजूक कुंभरे, किशोर आडे, शालिकराम मडावी, ज्ञानेश्वर मडावी, मन्साराम मडावी, जीवन गेडाम, महादेव सयाम, शरद मरसकोल्हे, छत्रुघ्न नामुर्ते उपस्थित होते. याप्रसंगी पाहुण्यांनी सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्व सांगितले. गोंड समाजात आधुनिकतेचे प्रवाह निर्माण होत असून डिजीटल युगात संस्कृती टिकवून ठेवणे व नव्याचा स्विकार करणे महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविक गोवर्धन कुंभरे यांनी केले. संचालन बबन कोडवते यांनी केले. आभार निवृत्ती उईके यांनी केले. सोहळ्यासाठी शंकर उईके, कैलाश परतेकी गराडा ग्रामवासीयांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
गोंड समाजबांधवांचा सामूहिक विवाह सोहळा
By admin | Updated: April 29, 2016 00:44 IST