शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

कोका अभयारण्यातील वनतलाव कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:31 AM

यंदाच्या अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. हिवाळा जेमतेम सुरु झाला असतांनाच कोका अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत. सोनकुंड वनतलावाच्या खोलीकरणावर जलयुक्त शिवार योजनेतून लाखोंचा खर्च करण्यात आला.

ठळक मुद्देवन्यप्राण्यांची भटकंती : वन्यजीव व मानव यांचा संघर्ष वाढणार, वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : यंदाच्या अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. हिवाळा जेमतेम सुरु झाला असतांनाच कोका अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत. सोनकुंड वनतलावाच्या खोलीकरणावर जलयुक्त शिवार योजनेतून लाखोंचा खर्च करण्यात आला. मात्र, दहा किमी परिसरातील उंच दऱ्याखोऱ्यातून जलसंचय होणारा सोनकुंड वनतलाव कोरडा झाला. तर राजडोह तलावात अत्यल्प पाणीसाठा आहे. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य चिंतेचा विषय झाला असून वन्यजीवांची भटकंती सुरू झाली आहे. यातून मानव आणि वन्यप्राणी यांचा संर्घष होण्याची भीती आहे.कोका वन्यजीव अभयारण्याची निर्मिती सन २०१३ मध्ये करण्यात आली. त्यामुळे वन्यजीवांना सुरक्षित अधिवास मिळाला. परिणामी जंगलात वन्यजीवांची संख्या झपाट्याने वाढली. सोयीसुविधा उभारण्यावर व पर्यटनाला चालना देण्यासाठी लाखोंचा खर्च करण्यात आला.यावर्षी अत्यल्प पावसामुळे वन्यजीव व मानव यातील संघर्ष पराकोटीला पोहचण्याचा अंदाज आहे. अभयारण्यातील महत्वपूर्ण वनतलावांत, बोड्यात, नाल्यांत पाण्याचा ठणठाणाट आहे. जानेवारी २०१९ पर्यंतही पुरेल एवढे पाणी तलावांत दिसून येत नाही. अभयारण्यातील बहुतेक मोठ्या तलावांची हीच अवस्था आहे. मागील वर्षी साकोली ते पालोरा राज्यमार्गालगत असलेल्या सोनकुंड वनतलावांचे खोलीकरण जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आले. लाखोंचा खर्च यावर करण्यात आला. मात्र, खोलीकरण झालेल्या भागातही पावसाचे पाणी साठविलेले नाही. या तलावात जंगलटेकडींच्या दहा किमी परिसरातील पाण्याचा जलसंचय होत असतांनाही भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य चिंतेचा विषय असून वनधिकाऱ्यांनी आतापासूनच त्यावर उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे.अभयारण्याच्या बफरझोनमध्ये वन्यजीवांमुळे भीतीचे वातावरण आहे. मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाळीव प्राण्यांचा फडसा व मनुष्यहाणीला सुध्दा सामोरे जावे लागत आहे. नागरीक सायंकाळी दहशतीत जीवन जगण्यास मजबूर आहेत. आता तर पाण्याच्या शोधात व्याकूळ वन्यजिव गावकुसात शिरण्याची भीती आहे. त्यातून नागरिकांवर हल्ले होण्याची शक्यता आहे. यासाठी उपाय योजण्याची गरज आहे. तसेच नागरिकांना दिलेले रोजगार निर्मितीचे व अन्य सोयीसुविधांचे आश्वासन पुर्ण करण्यात शासन-प्रशासन अपयशी ठरल्याची बोंब गावागावात आहे.शेतकऱ्यांपुढे भीषण दुष्काळाचे संकटगत दोन वर्षांपासून कोरड्या दुष्काळाचा सामना जिल्ह्याला करावा लागत आहे. यावर्षीही शेतकऱ्यांसमोर भीषण दुष्काळाचे संकट आहे. शेतकºयांनी केलेली मेहनत मातीज गेली. एका पाण्याचे हजारो एकर शेतीचे धानाचे पीक वाळले. पेरणी, नागरटी, खत, किटकनाशके, मंजुरीचा पैसा शेतकऱ्यांच्या माथ्यावर बसला. परंतू अजूनही शासन-प्रशासनाने नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे व मदतीचे आदेश दिलेले नाहीत. शासन शेतकऱ्यांच्या नावाने विविध योजनांची घोषणा करीत असला तरी जमिनीवरील परिस्थिती वेगळीच आहे. कर्जमाफी, पीकविता या बाबीच आता शेतकºयांना जाचक वाटू लागल्या आहेत.

टॅग्स :forestजंगल