शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गोदामाअभावी उन्हाळी धान खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:00 IST

नीक खरेदी विक्री सहकारी संस्थेद्वारे उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. गोदामाअभावी उन्हाळी धान खरेदी रखडल्याने तप्त उन्हात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लाखनी खरेदी केंद्रावर १७ मे पासुन दोन हजार ४३ क्विंटल उन्हाळी धान खरेदी झाली असून अजुनही पाच हजार क्विंटल धान लाखनी गोदामांच्या बाहेर उघड्यावर पडून आहे. धान खरेदी बंद असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

ठळक मुद्देपाच हजार क्विंटल धान केंद्रावर पडून : खरीप धानाचीही उचल नाही, लाखनी येथील प्रकार

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : स्थानीक खरेदी विक्री सहकारी संस्थेद्वारे उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. गोदामाअभावी उन्हाळी धान खरेदी रखडल्याने तप्त उन्हात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लाखनी खरेदी केंद्रावर १७ मे पासुन दोन हजार ४३ क्विंटल उन्हाळी धान खरेदी झाली असून अजुनही पाच हजार क्विंटल धान लाखनी गोदामांच्या बाहेर उघड्यावर पडून आहे. धान खरेदी बंद असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.खरेदी-विक्री संस्थेद्वारे सहा धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. लाखनी केंद्रावर २०४३ क्विंटल, सालेभाटा केंद्रावर १८१२ क्विंटल, कनेरी, गोंडेगाव, गुरढा ह्या गावासाठी असलेले जवेनाळा खरेदी केंद्रावर २६७ क्विंटल, एकोडी धान खरेदी केंद्रावर २६८५ क्विंटल, परसोडी सौदंड धान खरेदी केंद्रावर २६८५ क्विंटल, सातलवाडा खरेदी केंद्रावर ४७.२० क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. गोदामाअभावी धान खरेदी थांबली आहे.धान उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शासनाने आधारभुत धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. पावसाळी धानाची उचल अद्यापही झालेली नसल्यामुळे गोदाम भरलेले आहेत. नवीन माल ठेवण्यासाठी गोदाम नाही. जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना याबाबत माहिती दिली आहे. खरेदी विक्री संस्थेद्वारे सेवा सहकारी संस्था, बाजार समिती व काही खासगी गोदामाचा वापर धान ठेवण्यासाठी केला जातो.खरेदी विक्री संस्थाद्वारे खरीप हंगामात १ लाख १२ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आला. यापैकी ४० टक्के धानाची उचल झाली आहे. तर ६० टक्के धान गोदामात पडून आहे. खरीप धानाची उचल झालेली नसल्यामुळे उन्हाळी धान गोदामासमोर पडून आहे.उन्हाळी धानाला १७५० रुपयांचा भाव शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्रावर दिला जातो. गरजवंत शेतकरी आपला धान कवडीमोल भावात खासगी व्यापाऱ्यांना विकतांना दिसून येत आहे.शासन शेतकºयांच्या हिताच्या योजना तयार करीत असते. त्यात परिपुर्णतेचा अभाव आहे. अनेक शेतकरी उन्हाळी धानाकडे वळले आहे. ठोकळ धानाचे उत्पादन वाढले आहे. शेतकऱ्याच्या उन्हाळी धान उत्पादनाकडे कल वाढल्याने शासनाने धान खरेदी करण्याच्या यंत्रणेत वाढ करणे आवश्यक आहे. गोदामाची कमतरता जाणवत आहे.निकृष्ट दर्जाचे गोदामअनेक गोदाम निकृष्ठ प्रतीचे आहे. पावसाळ्यात पाणी गळत असते. गोदामात उंदीर, घुशीचा त्रास असतो. मालाची उचल लवकर होत नसल्याने मालात तुट निर्माण होते व त्याचा फटका खरेदी-विक्री संस्थेला बसतो. मागील वर्षी सहा महिन्यापर्यंत मालाची उचल केलेली नसल्याने खरेदी विक्री संस्थेला १२ लाख रुपयाची तुट सहन करावी लागली होती.गोदाम उपलब्ध करण्याबाबत आमदारांशी चर्चा केलेली आहे. खरीप धानाची उचल झालेली नाही. त्यामुळे गोदामाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हजारो क्विंटल धान खरेदी विक्रीच्या केंद्रावर पडुन आहे. अनेक शेतकरी ओला धान खरेदी केंद्रावर आणतात व खरेदी करण्याबाबत बळजबरी करतात. धान खरेदी केल्यानंतर ते धानाची उचल करण्यापर्यंत धानाच्या मोजमापात तुट दिसून येते. यामुळे खरेदी विक्रीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.- घनश्याम खेडीकर,सभापती खरेदी-विक्री सहकारी संस्था