शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

'ती' शाळा बंद करा, अन्यथा दंडात्मक कारवाई होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 11:14 IST

Bhandara : प्रकरण मोहाडीच्या नर्मदा कॉन्व्हेंटचे शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र धडकले

लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : मोहाडी येथील नर्मदा पब्लिक स्कूल व कारधा येथील हायटेक पब्लिक स्कूल शिक्षणाधिकाऱ्यांनी अनाधिकृत ठरवलेली आहे. त्यामुळे त्या दोन्ही शाळा तत्काळ बंद करण्यात याव्यात अन्यथा दंडाची कारवाई करू, असे पत्र शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद भंडारा आणि संबंधित शाळेच्या संस्थाप्रमुख, तसेच मुख्याध्यापकांना पत्र पाठवून कळविले आहे

सौजन्य शिक्षण संस्था कान्हळगाव या संस्थेची नोंदणी सहायक धर्मादाय आयुक्त, भंडारा यांनी २७ डिसेंबरला रद्द करण्यात आली आहे संस्थेद्वारा संचालित नर्मदा पब्लिक स्कूल, मोहाडी व हायटेक पब्लिक स्कूल, कारधा या दोन्ही शाळा बंद करण्यात याव्यात. शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे समायोजन नजीकच्या शाळेत करण्यात यावे, असे पत्र १२ जुलै २०२४ ला शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी संस्थाप्रमुख व मुख्याध्यापकांना दिले होते.

संस्थाप्रमुख व संबंधित पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांनी त्या पत्राला जुमानले नाही. याउलट विविध कारणे समोर करून शाळा बंद केली नाही. सौजन्य शिक्षण संस्था कान्हळगाव संचालित नर्मदा पब्लिक स्कूल, मोहाडी व हायटेक पब्लिक स्कूल, कारधा या शाळा तीन महिने होऊनही बंद करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अहित होत आहे. संस्थेची नोंदणी सहायक आयुक्त, यांनी रद्द केल्यामुळे संस्थेद्वारा संचालित शाळा अनधिकृत ठरत असल्याचे दिसून आले आहे. 

तर तरतुदीनुसार कार्यवाही विद्यार्थ्यांचे समायोजन नजीकच्या शाळेत करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा ठपका शिक्षणाधिकारी यांनी ठेवला आहे. शाळा तत्काळ बंद कराव्यात. अन्यथा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १८ नुसार रुपये १ लाखपर्यंत दंडाची रक्कम व त्यानंतरही शाळा अनधिकृतरीत्या सुरू राहिल्यास रुपये १० हजार प्रतिदिवशी दंड करण्याची तरतूद अधिनियमात करण्यात आलेली आहे. अन्यथा तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे पत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र सोनटक्के यांनी संबंधित संस्था व त्याची प्रत दोन्ही पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांना ८ ऑक्टोबर रोजी दिली आहे. आता या पत्राची दखल संबंधित संस्थाप्रमुख व मुख्याध्यापक किती गांभीवनि घेतात याकडे पालकांचे लक्ष लागलेले आहे.

टॅग्स :Schoolशाळाbhandara-acभंडारा