शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा

By admin | Updated: August 25, 2015 00:49 IST

समाजातील प्रत्येक माणसाला जीवन जगताना काही अडथळे येऊ नयेत यासाठी शासनातर्फे जसे कायद्याची तडजोड करण्यात आली आहे.

तलमले यांचे आवाहन : पिंडकेपार येथे समाधान योजना शिबिरसाकोली : समाजातील प्रत्येक माणसाला जीवन जगताना काही अडथळे येऊ नयेत यासाठी शासनातर्फे जसे कायद्याची तडजोड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. ज्यांचे पालन पोषण करणारे कोणी नाही अशा गरजूंसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यामुळे नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्कसाधून शासकीय योजनाचां लाभ घ्यावा असे मत उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांनी व्यक्त केले. महसूल विभागातर्फे तालुक्यातील पिंडकेपार येथे आयोजित महाराजस्व अभियानाचे विस्तारित स्वरुपातील समाधान योजना शिबिरात तलमले बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसिलदार डॉ. हंसा मोहणे, उपविभागीय अभियंता व्ही. डी. कांबडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जे. डब्ल्यू. सुखदेवे, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, पंचायत समिती सदस्य उषा डोंगरवार, सरपचं कऱ्हाडे, नंदु समरीत, मंडळ अधिकारी संजय बंसोड, खंडविकास अधिकारी झंझाड, उपसरपंच माणिक कापगते, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज भोयर, सहायक निबंधक ढोमणे, पुरवठा निरीक्षक धपाडे उपस्थित होते. या कार्यक्रमात ९३ आदिवासी बांधवांना वनहक्क जमिनीची वनपट्टे सातबाराला नाव दर्ज करुन पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. यानंतर राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय योजनेची दोन लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयाचे धनादेश देण्यात आले. या समाधान शिबिरात १० विभागाचे शिबिर लावण्यात आले होते. यात महसुल विभाग, कृषी विभाग, परिवहन विभाग, भूमी अभिलेख, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध विभाग, सेतु केंद्र, महिला व बालविकास, सहायक निबंध कार्यालय, पोलस विभाग हे त्यांच्या विभागामार्फत लोकांना माहिती देत होते.यात महसूल विभागांतर्गत पुरवठा विभागामार्फत ३० रेशनकार्ड वाटप करण्यात आले. ५० आधारकार्डची नोंदणी करण्यात आली. २५ ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. २७ लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप् करण्यात आले. प्रास्ताविक मंडळ अधिकारी आर. पी. निंबार्ते यांनी केले. संचालन व आभार एस. एम. ठाकरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)