लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी तुमसर तालुक्यातील पिंडकेपार येथील नागरिक तहसील कार्यालयावर धडकले. गत काही दिवसांपासून अतिक्रमणधारक आणि गावकऱ्यात वाद सुरु आहे.बावनथडी नदीच्या तिरावर १२०० लोकवस्तीचे पिंडकेपार गाव आहे. एक हेक्टर ९५ आर जागेत गावठाण आहे. तर ४८ हेक्टर ९५ आर जागेत वनविभागाचे क्षेत्र राखीव आहे. या गावात शासकीय जागा आणि नदीपात्रात ४९ आर जागा नोंद आहे. परंतु या जागेवर गावातील काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे चराईसाठी राखीव असणारी जागा लुप्त झाली आहे. अतिक्रमणधारकाच्या या प्रकाराने गावकरी त्रस्त झाले आहे. ग्रामसभेत या विषयावर चर्चा झाली. प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु महसुल प्रशासनाने तसदी घेतली नाही. त्यामुळे अतिक्रमणधारक आणि गावकºयात वाद निर्माण होऊ लागले. गावाचा विकास कार्यासाठी गावकरी एकवटले असतांना शासकीय यंत्रणा सहकार्य करीत नाही. अखेर गावकरी थेट तुमसर तहसील कार्यालयावर धडकले. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी उपसरपंच रमेश तोरणकर, जीतु पटले, होमकांत बुरके, विजय बोरकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देवेंद्र पटले, बाबु पटले, तीर्थराज पटले, जितेश्वर बोरकर, राजु किरणापुरे, चंद्रपाल गोमासे, मधुकर पारधी, रामेश्वर पारधी, शेखर पारधी, दशरथ मेश्राम, गणेश गोमासे, संतोष बोरकर आदी उपस्थित होते.
पिंडकेपारचे नागरिक धडकले तहसीलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 01:00 IST
बावनथडी नदीच्या तिरावर १२०० लोकवस्तीचे पिंडकेपार गाव आहे. एक हेक्टर ९५ आर जागेत गावठाण आहे. तर ४८ हेक्टर ९५ आर जागेत वनविभागाचे क्षेत्र राखीव आहे. या गावात शासकीय जागा आणि नदीपात्रात ४९ आर जागा नोंद आहे. परंतु या जागेवर गावातील काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे.
पिंडकेपारचे नागरिक धडकले तहसीलवर
ठळक मुद्देअतिक्रमण हटविण्याची मागणी : गावकरी व अतिक्रमणधारकांमध्ये वाद