शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राष्ट्रसंतांच्या नावावर नागरिकांची लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:06 IST

बुवाबाजी करणाºया पंड्याने स्वत:चे रक्षण करण्याकरिता संताचे पांघरुण घालून राष्ट्रसंतांची अवमानना करून नागरिकांना लुबाडण्याचा गोरखधंदा मागील अनेक वर्षापासून परसवाडा येथे राजरोसपणे सुरु असल्याचा आरोप गावातील पवन खवास, आशिष भगत, नीळकंठ सिंगाडे, नितेश पाटील या तरुणांनी पत्रपरिषदेत केला आहे.

ठळक मुद्देपरसवाडा येथील प्रकार : गावातीलच तरुण युवकांचा आरोप

आॅनलाईन लोकमततुमसर : बुवाबाजी करणाऱ्या पंड्याने स्वत:चे रक्षण करण्याकरिता संताचे पांघरुण घालून राष्ट्रसंतांची अवमानना करून नागरिकांना लुबाडण्याचा गोरखधंदा मागील अनेक वर्षापासून परसवाडा येथे राजरोसपणे सुरु असल्याचा आरोप गावातील पवन खवास, आशिष भगत, नीळकंठ सिंगाडे, नितेश पाटील या तरुणांनी पत्रपरिषदेत केला आहे.तुमसर तालुक्यातील परसवाडा (खापा) येथे जय गुरुदेव मानव सेवा आश्रम नावाची स्वतंत्र ट्रस्ट आहे. या ट्रस्टचे संचालक नाना कांबळे आहेत. सन १९९५ पूर्वी या महाराजांना अंगात देवी यायची. ते डोळ्यातून तांदूळ बुवाबाजी करून समाजात अंधश्रद्धा पसरविण्याचा काम परसवाडा गावातूनच करीत होते. त्यावेळी ते प्रसिद्ध झाले होते.दरम्यान सन १९९५-९६ च्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनचे श्याम मानव यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात नाना महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल केला व महाराजांचे पितळ उघडे पडले. त्यानंतर या महाराजांनी बुवाबाजीला पांघरून घालत संत लहरीबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाचा आसरा घेत नवीन गोरखधंद्याला सुरुवात केली. स्वयंघोषित संत बनून ते नाना महाराज म्हणून प्रसिद्धी मिळविण्यासाठी संतांच्या नावावर सप्ताह आयोजित करीत आहेत. लोकांचा घोळका जमविण्याकरिता बॅनर होर्डींग लावून संत असल्याचे भासवून आश्रमात हवन आदीचे पूजापाठ करवित आहेत. त्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवित असल्याचा आरोपही या तरूणांनी केला.संत महात्मे हे लोकांना चांगले उपदेश, चांगले वर्तन व सेवाभाव याविषयीचे धडे दिले. मात्र इथे त्यांचा विपरित घडत आहे. इतकेच काय तर संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीता पुस्तकावर आपला फोटो लावून राष्ट्रसंतांची अवमानना करीत आहे.गावात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. गावातील लोक सैरावैरा पाण्यासाठी होतात. मात्र या महाराजांना कधीच पाझर फुटत नाही व आश्रमातून एक थेंबही पाणी गावकऱ्यांना घेऊन जावू देत नाही. हे संतांचे कार्य आहेत का? असा प्रश्नही उपस्थित करून राजकीय पदाधिकाºयांनी दिलेल्या निधीचा फायदा कसा करतो व नागरिकांची लुबाडणूक करतो याविषयी काही उदाहरणादाखल सांगितले.