लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : कुस्ती जिगरबाजांचा खेळ मानला जातो. परंतू देशात फसवणुकीची कुस्ती खेळून मुठभर लोकांसाठी काम केले जात आहे. आर्थिक व सामाजिक विषमता वाढली आहे. बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार, लहान व्यावसायीक यांना कंगाल करून विदेश पलायनाचे धोरण राबविले जात आहे. महागाईने कंबर तोडली तर शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोल दिला जात नाही. नागरिकांनो, आता पुन्हा नव्या दमाने परिवर्तनाच्या खऱ्या कुस्तीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा भंडारा जिल्हा राईस मिलर्स असोशिएशनचे अध्यक्ष राजू कारेमोरे यांनी केले.पालोरा येथे दिपावलीच्या पर्वावर लक्ष्मी पूजनाचे दिवशी आयोजित कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी रूपचंद भोयर तर ग्राऊंड पूजन करतानी जि.प. सदस्य के.के. पंचबुद्धे व प्रकाश तिजारे उपस्थित होते. प्रमुख अतिथी सरपंच महादेव बुरडे, राईस मिल मालक मरगडे, पोलीस पाटील विरेंद्र रंगारी, भोजराम तिजारे, सुशील कुकडे, सुनिल कुकडे, सुखदेव मुरकुटे, परसराम काळे, घनश्याम समरीत, विजय हाडगे, फुलचंद भोयर, श्रीराम रेहपाडे, भूपेंद्र पवनकर, खुशाल अनिल काळे, कैलास मते, ठाणेदार तुकाराम कोयंडे, पोलीस हवालदार विजय सलामे, केशोराव कुकडे, पुरूषोत्तम बावनकर, उपसरपंच साकेश चिचगावकर, मनिषा बुरडे, रसिका धांडे, शिल्पा आराम, रोशन कढव, अनिल वैद्य, माजी उपसरपंच गणेश कुकडे, किरण शहारे, तंमुस अध्यक्ष व मुख्य आयोजक मनोहर रोटके उपस्थित होते.कार्यक्रमासाठी सुरेश बुरडे, जयदेव कुकडे, अमरकंठ मेश्राम, अमरकंठ धांडे, बळीराम अतकरी, विनोद कुकडे, गाढवे रोहा, हितेश बुरडे, संतोष मेश्राम, उमेश तुमसरे, भैय्या कनोजकर, प्रकाश भोयर यांनी े सहकार्य केले. कुस्ती आमदंगलीला काटी, मांढळ, जांभोरा, पालोरा, बोरगाव, रोहा, सुकळी, चारगाव, माडगी, कांद्री, जांब, ढोरवाडा, रोहणा येथील पहेलवान उपस्थित होते. यशस्वी पहेलवानांना बक्षिस व भेट वस्तूंचे वितरण करण्यात आले. संचालन पत्रकार युवराज गोमासे यांनी तर, आभार हितेश बुरडे यांनी मानले.
नागरिकांनो, परिवर्तनाच्या कुस्तीसाठी सज्ज व्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 00:36 IST
कुस्ती जिगरबाजांचा खेळ मानला जातो. परंतू देशात फसवणुकीची कुस्ती खेळून मुठभर लोकांसाठी काम केले जात आहे. आर्थिक व सामाजिक विषमता वाढली आहे. बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार, लहान व्यावसायीक यांना कंगाल करून विदेश पलायनाचे धोरण राबविले जात आहे.
नागरिकांनो, परिवर्तनाच्या कुस्तीसाठी सज्ज व्हा!
ठळक मुद्देराजू कारेमोरे : पालोरा येथे आमदंगलीचे उद्घाटन, स्पर्धेत नामवंत खेळाडूंचा सहभाग