सिनेस्टाईल पकडले दारुचे वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:19 PM2018-02-21T22:19:25+5:302018-02-21T22:20:22+5:30

Cinestile seized vehicles | सिनेस्टाईल पकडले दारुचे वाहन

सिनेस्टाईल पकडले दारुचे वाहन

Next
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : महामार्गावर रंगला थरार

आॅनलाईन लोकमत
भंडारा : नागपूर येथून दोन वाहनांमध्ये दारु भरून ती भंडाऱ्याकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून खरबी नाका येथून सदर पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून एका वाहनाला ताब्यात घेतले तर अन्य एक वाहन ताशी १५० च्या वेगाने पळून जाण्यात यशस्वी झाले. हा थरार मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर घडला.
सीजी १७ केसी १७१७ या वाहनातील दारु साठ्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत उपेंदरसिंग परशुरामसिंग (३८), सतनामसिंग अमरीकसिंग बैस (३३) दोन्ही राहणार रायपूर (छत्तीसगड) यांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश घुसर यांना नागपूर येथून सीजी १७ केसी १७१७ व एमएच ३४ के ७८६४ या चारचाकी वाहनातून भंडाऱ्याच्या दिशेने दारु भरून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खरबी नाका येथे सापळा रचला. दरम्यान त्यांच्या दोन कर्मचाºयांना माथनी टोल नाका येथे पाठवून सदर क्रमांकाची वाहने भंडाऱ्याच्या दिशेने निघाल्याची माहिती पथकाला मिळाली. यानंतर सुरु झाला सिनेस्टाईल दारु वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा पकडण्याचा थरार.खरबी नाका येथे खासगी व शासकीय वाहनासह सापळा रचून उभ्या असलेल्या पथकाने दारु वाहतूक करणारे वाहन जवळ येताच त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही वाहन चालकाने पोलीस दिसताच तेथून धूम ठोकली. वाहन भरधाव निघाल्याने पथकानेही त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केला. राष्ट्रीय महामार्गावर हा थरार प्रत्यक्ष स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अनुभवला. या पाठलागीत पेट्रोलपंप ठाणा जवळ सीजी १७ केसी १७१७ हे वाहन अडवून तपासणी केली असता त्या वाहनात १२ हजार ४८० रुपयांची देशी दारु आढळून आली. याप्रकरणी उपेंदरसिंग व सतनामसिंग यांना अटक केली. दरम्यान एमएच ३४ के ७८६४ च्या चालकाने तासी १५० च्या वेगाने वाहन पळवून पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. दारु तस्करांच्या वाहनाचा वेग बघता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्वत:च्या व नागरिकांच्या संभावित जीवीतहानीचा धोका टाळण्यासाठी पाठलाग सोडला. संधी साधून दारु तस्कराने भंडारा हद्दीतून धूम ठोकल्याने पोलिसांनी केवळ एकाच गाडीवर कारवाई करण्यात धन्यता मानली. सदर कारवाई पोलीस निरीक्षक विजय पोटे, कमलेश सोनटक्के, प्रितीलाल रहांगडाले, वामन ठाकरे, बोरकर, चोपकर, मोहरकर, रेहपाडे, चव्हाण, रोशन गजभिये, चामट, स्नेहल गजभिये, कौशिक रामटेके आदींनी केली.

Web Title: Cinestile seized vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.