शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

दोन कोटींच्या वास्तूचा चुराडा

By admin | Updated: August 27, 2015 00:52 IST

जनतेचा पैसा जनतेच्या हितार्थ लावला पाहिजे, असा जनसामान्य अर्थ शासकीय स्तरावर लावला जातो.

इंद्रपाल कटकवार भंडाराजनतेचा पैसा जनतेच्या हितार्थ लावला पाहिजे, असा जनसामान्य अर्थ शासकीय स्तरावर लावला जातो. परंतु भंडारा नगरपालिकेने हा सर्वसामान्य नियम पायदळी तुडविलेला दिसतोय. भंडारा बसस्थानक परिसराला लागून असलेल्या जुन्या कांजी हाऊस ाधील जागेत दोन कोटींचा खर्च करून २४ व्यापारी गाळ्यांचे बांधकाम केले. चार वर्षांचा कालावधी लोटला असला तरी आज हे गाळे फक्त शोभेची वास्तू ठरत आहे. जनतेचे दोन कोटी रूपये खर्चुन नगरपालिकेने काय साध्य केले, हा खरा प्रश्न आहे.सामान्य माणसाच्या जीवनात पाई अन् पाई जमा करायला त्याला अतोनात संघर्ष करावा लागतो. त्यातही कमाईचा हिस्सा कराच्या रूपाने शासनाला दिला जातो. असे असतानाही त्या हाडामासाच्या संघर्षाची कमाई ‘सामान्य माणसाचे प्रशासन’ कशी व्यर्थ वाया घालविते याचे ज्वलंत उदाहरण ही कांजी हाऊसमधील व्यापारी गाळ्यांना पाहून देता येईल. सन २०१० - ११ मध्ये नगर पालिकेच्यावतीने बसस्थानक परिसराला लागून असलेल्या कांजी हाऊस मध्ये व्यापारी गाळ्यांचे निर्माण केले. या कांजी हाऊसमध्ये मांडण्यात आलेल्या व्यापारी गाळ्यांची संख्या २४ आहे. सन २०१० मधील तत्कालीन अधिकाऱ्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या कांजी हाऊसबाबतच्या बांधकामाबाबत भविष्यकालीन दृष्टी पडद्याआड गेली होती काय? असेच म्हणावे लागेल. गाळ्यांचे बांधकाम करण्यासाठी नागरिकांच्या हक्काचे दोन कोटी रुपयांची अक्षरश: वाट लावण्यात आली. भंडारा बसस्थानक चौक ते सामान्य रुग्णालयाकडे जाणाऱ्या उजव्या हातावर ही प्राचीन इमारत आहे. या इमारतीचे प्रवेशद्वार इंग्रजकालीन असून पूर्वी येथून चुंगी वसुली केली जायची. काळाच्या ओघात यानंतर इथे कांजी हाऊस निर्माण करण्यात आले. विशेष म्हणजे ही इमारत रस्त्याच्या ५० फुट आत आहे. बांधकाम करण्यात आलेल्या गाळ्यांच्या उत्तर म्हणजेच रस्त्याच्या भागावर व्यापारी गाळे आहेत. हे गाळे आजच्या स्थितीत जीर्ण झाले आहेत. जेव्हा कांजी हाऊसमधील नवीन गाळे बांधण्यात आले तेव्हा जुन्या गाळ्यांचा विचार करण्यात आला नाही. जुने झालेल्या गाळ्यांची स्थिती चांगली नाही. आज हयात असलेले जीर्ण गाळ्यांमधील व्यापाऱ्यांनी सदर व्यापारी गाळ्यांची जागा आम्हाला देऊन त्याबद्दल शासकीय नियमाप्रमाणे वसुली करावी अशी विनंती केली होती. मात्र ओले हात करण्याच्या दृष्टीकोणातून की अन्य कोणत्या कारणातून उपयोग नसतानाही व नियोजनशून्य नियोजनातून बांधकाम करण्यात आले. परिणामी बांधण्यात आलेल्या व्यापारी गाळे आजच्या स्थितीला भंगाराच्या अवस्थेत आहेत.विशेष म्हणजे या व्यापारी गाळे असलेल्या भागात खुलेआम दारु, चरस व जुगार खेळण्यात येतो. काही दिवसांपूर्वीच शहरात घडलेल्या घटनांमुळे पोलिसांनी या परिसरातही छापामार कारवाई केली होती. या परिसरात आजही तासपत्ते, दारुच्या बाटल्या हमखासपणे दिसून येतात. येथे मोठ्या प्रमाणात घाणही दिसून येते. या जागेचा वापर लघुशंकेसाठीही करण्यात येतो. इंग्रजकालीन व ऐतिहासिक वास्तूला आज संपूर्णत: गालबोट लागले आहे. दोन कोटींचा चुराडा करून नगरपालिका प्रशासनाने कुणाचे घर भरले? ही बाब चौकशी झाल्यास आपोआप समोर येईलच.