शहरं
Join us  
Trending Stories
1
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
2
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
3
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
4
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
5
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
6
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
7
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
8
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
9
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
10
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
11
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
12
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
13
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
14
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
15
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
16
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
17
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
18
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
19
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
20
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं

मुलामुलीतील विषमतेची भावना नष्ट व्हावी

By admin | Updated: March 7, 2017 00:33 IST

मुलांमुलींबाबत असलेली विषमतेची भावना नष्ट करून समानतेचा दृष्टीकोन समाजात रूजविण्यासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ संकल्प उत्सव घेण्यात येत आहे.

शंकर राठोड : भिलेवाडा येथे बेटी बचाओ संकल्प उत्सव भंडारा : मुलांमुलींबाबत असलेली विषमतेची भावना नष्ट करून समानतेचा दृष्टीकोन समाजात रूजविण्यासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ संकल्प उत्सव घेण्यात येत आहे. या उत्सवाच्या माध्यमातून विषमतेची भावना नष्ट व्हावी, असे प्रतिपादन वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड यांनी केले.भंडारा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या मीना राजू मंच अंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ संकल्प भिलेवाडा येथील ईरा पब्लिक स्कूलमध्ये घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्या शहरबानो खान या होत्या. अतिथी म्हणून कार्तिक मेश्राम, शंकर राठोड, सरीता रहांगडाले, ज्योती नाकतोडे, डॉ. बोंदरे, डॉ. सोनाली लांबट, विनिता चकोले, डॉ. चिमणे, एच.बी. सरादे, राम वाडीभस्मे, ओम वाघाये आदी उपस्थित होते.आठवीच्या विद्यार्थ्यांनीच व त्यांच्या पालकांना या संकल्प उत्सवात आंमंत्रित केले होते. मार्गदर्शक कार्तिक मेश्राम म्हणाले, मुलगा व मुलगी यांच्यात कोणताही भेदभाव न ठेवता आईवडिलांनी मुलांप्रमाणेच मुलींना सुद्धा उच्च शिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले पाहिजे. शाळेच्या मुलींनी नृत्य व पथनाट्य सादर करून मुलींना स्वत:चे रक्षण कसे करावे व मुलींना मुलांप्रमाणे जगण्याचा हक्क मिळावा हे दाखवून दिले. पहेला गांधी विद्यालयात शाळेतील चमूंनी पथनाट्य सादर केले. मुलगा एकाच घराचे नौवलौकिक करतो तर मुलगी ही माहेर व सासर या दोन्ही घरी नावलौकिक करून सेवा देत असते. डॉ. चिमने यांनी मुलींना स्वत: घ्यावयाची वैयक्तिक काळजी, त्यांची स्वच्छता, स्वत:चे संरक्षण यावर त्यांना माहिती दिली. डॉ. बोंदरे यांनी मुलींना हात धुण्याच्या पद्धती शिकविल्या. त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबद्दल माहिती दिली. उपप्राचार्य खान यांनी मुलींचे आपल्या जीवनात खुप महत्व आहे व तो अनमोल ठेवा आपण कसा जपून ठेवावा ते सांगितले. संचालन शिक्षिका पद्मा मोटघरे, शकुन डहारे यांनी केले. यावेळी विद्यार्थीनी, सहभागी शाळेतील शिक्षक, पालक व ईरा पब्लिक शाळेचे शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)