शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बालहक्क संरक्षण आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना ‘समन्स’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 06:35 IST

वेळेत कृती अहवाल सादर न केल्याबाबत द्यावे लागणार स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहा निष्पाप तान्हुल्यांचा बळी घेणाऱ्या भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या अग्निकांड प्रकरणात राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. आयोगाने कारवाईचा कृती अहवाल दिलेल्या मुदतीत सादर न केल्यामुळे भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांना ‘समन्स’ बजावले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना १८ जानेवारीला आयोगासमक्ष  ‘ऑनलाइन’ उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे लागेल. या प्रकरणी अद्याप एकही गुन्हा दाखल न झाल्याने हलगर्जीबाबत संताप व्यक्त होत आहे, हे विशेष.

रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्याचदिवशी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणात नेमकी काय कारवाई झाली, त्याचा कृती अहवाल सादर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र, ४८ तास उलटून गेल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांकडून या संदर्भातील कृती अहवाल आयोगाला मिळाला नाही. त्यामुळे आयोगाने भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘समन्स’ बजावले आहे.

माझ्यापर्यंत ‘समन्स’ आले नाही : जिल्हाधिकारीयासंदर्भात जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडून मला कुठल्याही प्रकारची नोटीस किंवा ‘समन्स’ आलेले नाही, असे स्पष्ट केले. माझ्या माहितीनुसार अशाप्रकारची नोटीस असेल तर ती अगोदर शासनाला येईल. त्यानंतर ती माझ्यापर्यंत येईल, असेदेखील सांगितले.

दुर्घटनेबाबत समितीचा अहवाल रविवारी येणार

मुंबई : विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती याची चौकशी करीत आहे. ही समिती येत्या रविवारी अहवाल सादर करेल, असे आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी कॅबिनेटच्या बैठकीत सांगितले. तर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुरक्षाविषयक ऑडिटच्या सूचना दिल्या आहेत. अग्निशमन यंत्रणा व विद्युत विभागांनाही रुग्णालयांतील वीज व अग्निशमन यंत्रणांच्या तपासणीच्या सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ना फायर ऑडिट, ना फायर हायड्रंटअग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर फायर ऑडिटचा मुद्दा समोर आला आहे. ना फायर ऑडिट, ना फायर हायड्रंट, अशीच अवस्था दिसत आहे. 

राज्यपालांकडून पालकांना प्रत्येकी २ लाख

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आगीत १० बालकांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तातडीने करा, असे निर्देश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बुधवारी दिले. अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना स्वेच्छा निधीतून प्रत्येकी दोन लाखांची मदत त्यांनी जाहीर केली. जिल्हा रुग्णालयात शनिवारी पहाटे घडलेल्या अग्निकांड दुर्घटनेच्या घटनास्थळाची कोश्यारी यांनी बुधवारी सकाळी पाहणी केली व बाल अतिदक्षता कक्षातील शिशूंच्या मातांसोबत संवाद साधला. एसएनसीयूमधील आगीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि यानंतर मृत बालकांच्या कुटुंबीयांना दिलेल्या आर्थिक मदतीची माहिती दिली. तत्पूर्वी विश्रामगृहावर विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपालांना भेटून या घटनेसंदर्भात निवेदने दिली.

 

 

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी