शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिखली येथे कोरोना नियमांच्या चाकोरीत बैलपोळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST

दरवर्षी नक्षीकाम केलेली झूल, बैलांच्या शिंगाना बेगड तसेच चांगले सजवून गावातून दरवर्षी मिरवणूक काढून गावातील हनुमान मंदिरासमोर लांब तोरण बांधले जाते. या तोरणाखाली गावातील सर्व बैलजोड्या एकत्र उभ्या केल्या जातात. मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी मंदिरासमोर एकेक बैलजोडी उभी करुन पूजन केले . गावकऱ्यांमध्ये बैल पोळ्याचा उत्साह असला तरी प्रशासनाच्या निर्देशामुळे गावकऱ्यांनी बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निश्चय केला.

ठळक मुद्देमिरवणुका केल्या रद्द : सण सर्जा राजाचा, परंपरा झाली खंडीत, प्रशासनाच्या निर्देशाचे पालन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दरवर्षी आपल्या लाडक्या सर्जा-राजाचा बैलपोळा सण उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आहे . मात्र यंदा शेतकऱ्यांचा आवडता बैल पोळा सणासाठी प्रशासनाने निर्देश दिल्याने भंडारा तालुक्यातील चिखली येथे गावकऱ्यांनी शासकीय नियमांच्या पालनात साध्या पद्धतीने बैलपोळा सण साजरा केला. यावर्षी प्रथमच बैलांच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या. श्रावणातील अमावसेला साजरा होणारा बैलपोळा सणावर यावर्षी कोरोनाचे सावट ग्रामीण भागातही दिसून आले.भंडारा तालुक्यातील चिखली हे शेतीत नवनवीन प्रयोग करणारे एक छोटेसे खेडेगाव. मात्र शेतकरी नवनवीन उपक्रम राबवत असल्याने मुख्य व्यवसाय शेती असणाऱ्या या गावात आजही गावात ५० बैलजोड्या आहेत.दरवर्षी नक्षीकाम केलेली झूल, बैलांच्या शिंगाना बेगड तसेच चांगले सजवून गावातून दरवर्षी मिरवणूक काढून गावातील हनुमान मंदिरासमोर लांब तोरण बांधले जाते. या तोरणाखाली गावातील सर्व बैलजोड्या एकत्र उभ्या केल्या जातात. मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी मंदिरासमोर एकेक बैलजोडी उभी करुन पूजन केले . गावकऱ्यांमध्ये बैल पोळ्याचा उत्साह असला तरी प्रशासनाच्या निर्देशामुळे गावकऱ्यांनी बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निश्चय केला.याबाबत बोलताना चिखली येथील शेतकरी तंमुस अध्यक्ष विष्णु हटवार, तानाजी गायधने, शाम आकरे यांनी सांगितले की, वर्षातून एकदा येणारा बैलपोळा सण यावर्षी प्रथमच मिरवणुका व गावकरी एकत्र न येता साजरा झाल्याने अनेक वर्षांची परंपरा प्रथमच खंडित झाल्याचे सांगितले. आजही गावात ५० बैलजोड्या आहेत.यांत्रिकीकरणाचा वापर वाढत चालल्याने आणि शेतकऱ्यांनी बैलजोड्या कमी केल्याचे चित्र अनेक गावात दिसत असले तरी चिखलीमध्ये आजही अनेक शेतकऱ्यांच्या दारात आपली बैल जोडी उभी आहे. दारात अडीअडचणीच्या वेळी बैल नेहमी बळीराजाच्या मदतीला धावून येत असल्याचेही येथील वयोवृद्ध शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले . बैलपोळा सण फिजिकल डिस्टन्सिंगच्या पालनासाठी गावातील रामदास मेहर, सुरेश मेहर, सुखदेव मेहर, सुखदेव वाघमारे, पंचकमेटी अध्यक्ष अशोक गायधने, तानाजी गाधने, रेवानंद गायधने, होमदास हटवार, पोलीस पाटील गोवर्धन मेहर व अन्य गावकऱ्यांनी सहकार्य केले.बैलपोळा सणाला गावातील सर्व बैलजोड्या एकाच तोरणाखाली आणून गावातील हनुमान मंदिरासमोर पूजन करण्याच्या परंपरेला यंदा प्रथमच खंड पडला. यावर्षी गावातून बैलांच्या मिरवणूकाही निघाल्या नाहीत. मुलांचा तान्हा पोळाही भरणार नसल्याचे दु:ख वाटत आहे.-तानाजी गायधने,शेतकरी चिखली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी