शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

रसायनयुक्त पिकविलेली फळे आरोग्यासाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

उन्हाळ्याच्या दिवसात आंब्यासह थंड फळांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते. यावर्षी सातत्याने वातावरण बदलाच्या परिणामाने जिल्ह्यातील आंब्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे फळांना केमीकलयुक्त पद्धतीने पिकवून फळ विक्रेते फळांची विक्री करीत आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : फळे खरेदी करताना दक्षता घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने फळांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र लॉकडाऊनचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसल्याने जिल्हाबाहेरुन येणाऱ्या फळांची आवक मंदावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रसायनांचा वापर करून पिकविलेली फळे विक्रीसाठी बाजारात येत असल्याने रसायनयुक्त पिकविलेली फळे आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.उन्हाळ्याच्या दिवसात आंब्यासह थंड फळांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते. यावर्षी सातत्याने वातावरण बदलाच्या परिणामाने जिल्ह्यातील आंब्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे फळांना केमीकलयुक्त पद्धतीने पिकवून फळ विक्रेते फळांची विक्री करीत आहेत.अनैसर्गिक पद्धतीने फळांवर रसायनांचा वापर वाढत असल्याने अशा फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने ठिकठिकाणच्या फळविक्रेत्यांकडून तपासणी करण्याची गरज आहे.गत काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात एक टरबूज फुटून स्फोट झाल्याची घटना घडली होती. यावरून फळांमध्ये केमीकलचा तसेच विविध रसायने वापरून त्वरीत बाजारपेठेत विकण्याची स्पर्धाच सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.नागरिकांनी फळे विक्री करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत असताना महामार्गावरुन परतणारे मजूर, वाहनधारक अनेकदा फळे खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे या ठिकाणी फळ विक्रेत्यांनी फिजीकल डिस्टन्सिंगसह सॅनिटायझरचा वापर करण्याची गरज आहे.मात्र अनेक ठिकाणी फळविक्रेते याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नैसर्गिकरित्या शेतकऱ्यांनी पिकविलेल्या फळांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळ पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे कलींगड, खरबूज, आंबा, चिकू यासारखी फळे जिल्ह्यातील अनेक शेतकºयांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेतकºयांच्या फळांना थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. फळ उत्पादक शेतकºयांना मोठा दिलासा मिळू शकतो. लॉकडाऊन काळात अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी स्टॉलवर विक्रीसाठी असणारी फळे अनैसर्गिकरित्या पिकविलेली आहेत. हे माहिती असतानाही अनेकदा याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.फळांच्या मागणीत लक्षणीय वाढउन्हाळ्याच्या दिवसांमुळे ग्राहकांकडून फळांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र अनेक ठिकाणी सुरु असलेल्या अनैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या फळांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Healthआरोग्य