रसायनयुक्त पिकविलेली फळे आरोग्यासाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:20+5:30

उन्हाळ्याच्या दिवसात आंब्यासह थंड फळांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते. यावर्षी सातत्याने वातावरण बदलाच्या परिणामाने जिल्ह्यातील आंब्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे फळांना केमीकलयुक्त पद्धतीने पिकवून फळ विक्रेते फळांची विक्री करीत आहेत.

Chemically ripened fruits are dangerous to health | रसायनयुक्त पिकविलेली फळे आरोग्यासाठी धोकादायक

रसायनयुक्त पिकविलेली फळे आरोग्यासाठी धोकादायक

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : फळे खरेदी करताना दक्षता घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने फळांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र लॉकडाऊनचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसल्याने जिल्हाबाहेरुन येणाऱ्या फळांची आवक मंदावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रसायनांचा वापर करून पिकविलेली फळे विक्रीसाठी बाजारात येत असल्याने रसायनयुक्त पिकविलेली फळे आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात आंब्यासह थंड फळांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते. यावर्षी सातत्याने वातावरण बदलाच्या परिणामाने जिल्ह्यातील आंब्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे फळांना केमीकलयुक्त पद्धतीने पिकवून फळ विक्रेते फळांची विक्री करीत आहेत.अनैसर्गिक पद्धतीने फळांवर रसायनांचा वापर वाढत असल्याने अशा फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने ठिकठिकाणच्या फळविक्रेत्यांकडून तपासणी करण्याची गरज आहे.
गत काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात एक टरबूज फुटून स्फोट झाल्याची घटना घडली होती. यावरून फळांमध्ये केमीकलचा तसेच विविध रसायने वापरून त्वरीत बाजारपेठेत विकण्याची स्पर्धाच सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नागरिकांनी फळे विक्री करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत असताना महामार्गावरुन परतणारे मजूर, वाहनधारक अनेकदा फळे खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे या ठिकाणी फळ विक्रेत्यांनी फिजीकल डिस्टन्सिंगसह सॅनिटायझरचा वापर करण्याची गरज आहे.
मात्र अनेक ठिकाणी फळविक्रेते याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नैसर्गिकरित्या शेतकऱ्यांनी पिकविलेल्या फळांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळ पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे कलींगड, खरबूज, आंबा, चिकू यासारखी फळे जिल्ह्यातील अनेक शेतकºयांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेतकºयांच्या फळांना थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. फळ उत्पादक शेतकºयांना मोठा दिलासा मिळू शकतो. लॉकडाऊन काळात अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी स्टॉलवर विक्रीसाठी असणारी फळे अनैसर्गिकरित्या पिकविलेली आहेत. हे माहिती असतानाही अनेकदा याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

फळांच्या मागणीत लक्षणीय वाढ
उन्हाळ्याच्या दिवसांमुळे ग्राहकांकडून फळांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र अनेक ठिकाणी सुरु असलेल्या अनैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या फळांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Chemically ripened fruits are dangerous to health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य