शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!
2
IPL 2025: दोन दिग्गजांचे होणार संघात 'कमबॅक'; PBKS vs RCB सामन्याची वाढणार चुरस
3
'PoK मधील लोक आपले आहेत, किती दिवस दूर राहतील...', राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
4
"वैष्णवी हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणला पकडून ठेवलंय, त्याच्याकडे दोन पिस्तुल"; पोलिसांना फोन आला, अन्...
5
आयटेलचा ए ९० : परवडणाऱ्या किंमतीतील AI आयवाना असलेला स्मार्टफोन, कसा आहे; फिचर्स काय...
6
Corona Virus : चिंता वाढतेय! देशात कोरोना हात-पाय पसरतोय; रुग्णांची संख्या १२०० पार, १२ जणांचा मृत्यू
7
विकली जाणार Castrol कंपनी, रिलायन्सपासून सौदी अरामकोपर्यंत घेताहेत इंटरेस्ट; जाणून घ्या
8
IPL 2025: २५०० हून जास्त जवान, ६५ अधिकारी अन् मॉकड्रिल... पंजाब-RCB सामन्यासाठी चोख बंदोबस्त
9
हृदयद्रावक! मीटिंगमध्ये जोरात खोकला, घाम आला... अधिकाऱ्याने हार्ट अटॅकने जीव गमावला
10
यशने सुरु केलं 'रामायण'चं शूट, आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शकासोबतचे सेटवरील फोटो व्हायरल
11
देशातील एकमेव मंदिर, इथे भाविक देवाकडे करतात मृत्यूची मागणी, अशी आहे आख्यायिका
12
प्राची पिसाट प्रकरण मिटवण्यासाठी सायबर क्राइमने केला फोन, पण सुदेश म्हशिलकर यांनी केलं असं काही की...
13
हनिमूनला गेलेलं कपल अजूनही बेपत्ता; ड्रोनच्या मदतीने घेतला जातोय शोध; काय आहे हे प्रकरण?
14
'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ६ वर्षांनी घरी पाळणा हलणार
15
अमिताभ बच्चन यांची अयोध्येत मोठी गुंतवणूक; खरेदी केला 40 कोटी रुपयांचा भूखंड...
16
प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नी आणि सासूविरोधात केली पोलिसात तक्रार, प्रकरण नेमकं काय?
17
Jyoti Malhotra : "पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा?
18
"अभिमान वाटतोय की माझे काका...", पद्मश्री पुरस्कारानंतर अशोकमामांना विमानात मिळालं खास सरप्राइज
19
Post Office मध्ये RD सुरू केली असेल तर करू नका 'ही' चूक, २.७% पर्यंत कमी होऊ शकतं व्याज
20
लातूर: ट्रॅव्हल्स बसचा उदगीरकडे जाताना पहाटेच्या वेळी अपघात, दोन ठार, ३४ जण जखमी

रुग्णालयातील कारभार चव्हाट्यावर

By admin | Updated: May 9, 2015 00:45 IST

येथील ग्रामीण रुग्णालयातील अव्यवस्थेमुळे रुग्णांची गैरसोय नित्याची बाब आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनियमितता, ...

आमदारांनी केली रुग्णालयाची पाहणी : प्रकरण अड्याळ येथील ग्रामीण रूग्णालयाचेअड्याळ : येथील ग्रामीण रुग्णालयातील अव्यवस्थेमुळे रुग्णांची गैरसोय नित्याची बाब आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनियमितता, कर्मचाऱ्यांशी, रुग्णांशी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांशी असमम्य वागणूक तसेच आकस्मिक सेवेलाही ग्रहण लागले आहे. डॉक्टर हजर नाही तर काही रुग्णवाहिका उपलब्ध नाही. एकंदरीत वेळेवर एकही कामात नाही अशा एक ना अनेक समस्या लोकमतमध्ये प्रकाशित होताच आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय सेवेची माहिती घेतली. दरम्यान ड्युटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळल्याने संताप व्यक्त केला. यावेळी रुग्णांशी चर्चा करून त्यांनी समस्या जाणून घेतल्या.मागील काही दिवसांपासून ग्रामीण रुग्णालयाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे कुणाचेही समस्यांकडे लक्ष नाही. यामुळे उपचारासाठी आणलेल्या किंवा आलेल्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. समस्या आवासून उभ्या असताना रुग्णांची ओरड असूनही वैद्यकीय अधीक्षक याकडे लक्ष देण्याचे सौजन्य दाखवीत नसल्याचे रूग्णांनी सांगितले.आरोग्य सेवा आजारी असल्याचा प्रत्यय अनेकांना आला. यासंबंधी तक्रारी आमदारांकडे देण्यात आल्या. या तक्रारीची तसेच वृत्तपत्रात प्रकाशित बातम्यांची दखल घेत आमदारांनी ग्रामीण रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली. या भेटीत ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांची वेळ व मोबाईल नंबर बोर्डावर लिहिणे, ड्युटी हजेरी रजिस्टर तत्काळ बनविण्याचे आदेश दिले. बायोमेट्रिक पद्धत नियमित ठेवण्यासह रुग्णालयातील लाईट, पाणी या समस्यांकडे लक्ष वेधले. रुग्णालयात अनियमितता दिसून येताच अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून रुग्णांची गैरसोय टाळण्याचे निर्देश दिले. (वार्ताहर)