शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाची बदलती दिशा विकासाला मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गत दोन-तीन वर्षात राजकारणाची दिशा बदलली असून पैसा, कंत्राटदारी आणि सत्ता या बळावर राजकारणी ...

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत दोन-तीन वर्षात राजकारणाची दिशा बदलली असून पैसा, कंत्राटदारी आणि सत्ता या बळावर राजकारणी आपला फायदा करून घेत आहे. हा प्रकार विकासासाठी मारक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अलिकडे नेत्यांना विकासाची दुरदृष्टी नाही. पैसा, ठेकेदारी आणि सत्तेच्या भरोशावर राजकारण केले जात आहे. भावनात्मक प्रचार करून तात्कालीक फायदा करून घेतला जातो. समाजसेवा, चांगले काम करण्याची वृत्ती, क्षमता आणि दुरदृष्टी राजकीय नेत्यांमधून हरवत चालल्याचे दिसत आहे. हा प्रकार आता जनतेने समजून घेतला पाहिजे अन्यथा भंडारा जिल्हा विकासापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही, असे खासदार पटेल म्हणाले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे. जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. भाजपा सरकारने ३७० कलम काश्मीरमधून हटविले. सुरूवातीला आम्ही त्यांच्या विरोधात नव्हतो. परंतु ज्यापद्धतीने त्यांनी काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून केंद्रशाशित प्रदेश केला. त्यामुळे आम्ही नाराज झालो. परिणामी आम्ही मतदानातही भाग घेतला नाही, असे त्यांनी सांगितले. बॅलेट पेपरवर मतदान व्हावे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. परंतु निवडणूक आयोग काय निर्णय घेते यावर सर्व अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.शेती उत्पादन निर्यातक्षम करण्याचा प्रयत्नभंडारा जिल्ह्यातील शेती उत्पादन निर्यातक्षम करण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. जिल्ह्यात धानासोबतच मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतले जाते. यासाठी काही मार्केटिंगसाठी योजना तयार केली जात आहे. त्याला आम्ही लवकरच मूर्त रूप देवू. यातून या भागातील शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकचे मिळतील, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्याबाबत विचारले असता खासदार पटेल म्हणाले, ही मोठी बाब नाही. पत्रपरिषदेला माजी खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसprafull patelप्रफुल्ल पटेल