शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

चक्रवर्ती राजाभोज आदर्श जाणता राजा

By admin | Updated: February 27, 2017 00:30 IST

अकराव्या शतकात मध्यभारतात अनुशासनप्रिय चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन ...

खासदार नाना पटोले यांचे प्रतिपादन : सिंदपार येथे पार पडला जयंती समारोह, शेकडो समाजबांधवांची उपस्थितीभंडारा : अकराव्या शतकात मध्यभारतात अनुशासनप्रिय चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन ५५ वर्षे ७ महिने ३ दिवस राज्य केले. त्यांना अखंड भारताचे प्रणेता संबोधले जाते. जोपर्यंत राजाभोज जिवंत होते तोपर्यंत त्यांनी विदेशी राज्यकर्त्यांना भारतातील हद्दीत पाय ठेवू दिला नाही. राजाभोज पोवार समाजाचे गौरव तर होतेच त्याचबरोबर सर्व समाजाकरिता देखील आदर्श जाणता राजा होते, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.सिंदीपार येथे आयोजित राजाभोज जयंती समारोह दरम्यान खासदार नाना पटोले बोलत होते. यावेळी आमदार बाळा काशिवार, सरपंच तुकाराम बोपचे, पृथ्वीराज रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, पंचायत समिती सदस्य मोरेश्वरी पटले, प्रेम बोपचे, अ‍ॅड. पुनात्री रहांगडाले, जगदीश येळे, अशोक येळेकर, भास्कर बावणकर, हेमचंद्र बोपचे, रामेश्वर बिसेन, ज्ञानेश्वर येळेकर, उपराज टेंभरे, अशोक पटले, वनिता येळेकर, चैतराम हरीनखेडे, दिनेश येळेकर, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी खा.पटोले यांनी, सर्व मागासवर्गीय समाजासह आदिवासी लोकांनी एकजुट होऊन सर्व क्षेत्रात विकास करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. बहुजन समाज विभीन्न जाती - जातीमध्ये विभागला आहे. काही षडयंत्रकारी शक्ती बहुजन समाजाला विभागण्याचे कार्य करीत आहेत. हे षडयंत्र हाणून पाडून बहुजन समाजाने संघटीतरित्या विकास साधावा. चक्रवर्ती राजाभोज यांनी त्यांच्या काळात अशा शक्तीविरोधात लढा देऊन सर्व समाजाला जोडण्याचे कार्य केले. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता ते लढत राहिल्याचे त्यांनी सांगितले. सर्व मागासवर्गीय जातींनी एकत्र येवून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या मार्गावर ओबीसी समाजाने विकास कार्याची कास धरून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता क्षेत्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जनता दरबार बोलावल्याचे सांगितले व याचा लाभ सर्व समाजाच्या पीडित लोकांनी घेण्याचे त्यांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी ते पुढे म्हणाले की, बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त तालुक्याच्या ठिकाणी ओबीसी समाजाच्या मुलांकरिता १२५ व मुलींकरिता १२५ विद्यार्थ्यांचे वसतिगृह अनुसूचित जाती जमातीची धर्तीवर राज्य शासनाने सुरु करावे व क्रिमीलेअरची अट रद्द करावी अशी मागणी केली. यावेळी त्यांनी शासनातर्फे सुरु असलेल्या योजनांना लाभ घेण्याचे प्रतिपादन खा.पटोले यांनी उपस्थितांना केले. यावेळी पटोले यांनी खा.विकासनिधी अंतर्गत मंजूर समाज भवनाचे भूमिपूजन केले. समाजबांधवांनी या समाजभवनाचा लाभ घेवून येथे सामूहिक विवाह आयोजित करण्याचेही आवाहन केले. याप्रसंगी पटोले यांनी सुरुवातीला पोवारी भाषेत मार्गदर्शनाला सुरुवात करून स्व.पी.डी. रहांगडाले यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला व ते आम्हा सर्वांसाठी आदर्श असल्याचे सांगितले.बाळा काशिवार यावेळी म्हणाले, पोवार समाजातील युवकांनी व महिलांनी विकास कामाकरिता पुढे यावे, राजाभोज यांचा आदर्श समोर ठेवून युवकांनी व महिलांनी कुटुंब, समाज आणि राष्ट्राचा विकास करण्याचे आवाहन केले. यावेळी इतर मान्यवरांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. पोवार समाजातील युवक युवतींनी पोवारी भाषेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन मोहीत केले. प्रास्ताविक राष्ट्रीय पवार महासभेचे महासचिव व या जयंती समारोहाचे संयोजक जगदीश येळे यांनी केले. तथा आलेल्या मान्यवरांचे राजाभोय क्षत्रीय पवार समाज सिंदीपारचे सहसचिव अशोक येळेकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला छगन राहांगडाले, धनराज पारधी, शिवराम बघेले, प्रदीप राहांगडाले, सी.टी. पारधी, मनोज पटले, पुरुषोत्तम राणे, पुरुषोत्तम टेंभरे, रेवता पटले, सरिता येळेकर, प्रतिभा येळेकर, रत्नकला पटले, नूतन ठाकरे, सहसराम पटले, राजाभोज जयंती समारोह, राजाभोय क्षत्रिय पोवार समाज सिंदीपारचे सर्व कार्यकर्ते, राजेगाव, मोरगाव, सालेभाटा, केसलवाडा, परसोडी, मासलमेटा, उसगाव, पळसपाणी, किन्ही, सराटी, चिचगाव येथील समाजबांधवांनी सहकार्य केले. यावेळी समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)