शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

सिमेंट रस्ते झाले भ्रष्टाचाराचे कुरण

By admin | Updated: January 29, 2015 23:01 IST

आठ ते दहा दिवसात सिमेंट रस्ता बांधायचा, लगेच बिल काढायचे, मात्र गुणवत्तेची लक्तरे वेशीवर टांगायची. इस्टीमेटचा उपयोग केवळ निधी मंजुरीसाठी करायचा. मोजमाप पुस्तिकेत

रवींद्र चन्नेकर - बारव्हाआठ ते दहा दिवसात सिमेंट रस्ता बांधायचा, लगेच बिल काढायचे, मात्र गुणवत्तेची लक्तरे वेशीवर टांगायची. इस्टीमेटचा उपयोग केवळ निधी मंजुरीसाठी करायचा. मोजमाप पुस्तिकेत इस्टीमेटप्रमाणे नोंदी घ्यायच्या. असा प्रकार लाखांदूर तालुक्यात सुरु असून तीन वर्षात बांधलेले सिमेंट रस्ते बेपत्ता झाल्याचे दिसत आहे. जणू विविध विकास योजनातून बांधण्यात येणारे सिमेंट रस्ते भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. वरिष्ठ स्तरावरून चौकशी केल्यास मोठे मासे यात गळाला लागू शकतात.लाखांदूर तालुक्यात गेल्या तीन वर्षात गावागावात कोट्यावधी रुपये खर्च करून सिमेंट रस्त्याचे निर्माण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषदेअंतर्गत, पंचायत समितीच्या माध्यमातून गावागावात सिमेंट रस्ते निर्माण करण्यात आले. दलित वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना, १३ वा वित्त आयोग, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना, आमदार, खासदार, निधी, पंचायत समिती, सदस्य, विकास निधी (ग्रामपंचायतीचा निधी) यातून या रस्त्यांचे बांधकाम केले जात आहे. वर्षभरापूर्वी सिमेंट रस्ते बांधताना त्यात लोखंडी गजांचा वापर केला जात होता. परंतु आता सरळ काँक्रीट टाकून रस्ते बांधले जात आहे.नियमाप्रमाणे ८० बाय ४० एमएमचा मोठा, गिट्टा १०-१२ एमएमची गिट्टी असे तीन घरांची दबाई करून त्यावर ११ इंच जाडीचा सिमेंटचा रस्ता तयार करावा लागतो. दर्जेदार शासन मान्य कंपनीचे, सिमेंट, नदीतील स्वच्छ रेतीआणि रस्त्यावर कॅरी करून पाणी मारावे लागते. या पद्धतीने सिमेंट रस्ता तयार केल्यास पाच वर्षे कुठेही खड्डा पडत नाही. परंतु मागील काही वर्षापूर्वी बांधलेल्या रस्त्यांची अवस्था या सर्व नियमांना तडा देणारी आहे. बांधकामानंतर दोन ते महिन्यात तर काही रस्ते सहा महिन्यात उखडले आहेत. वर्षभरानंतरच येथे सिमेंट रस्ता होता असे सांगावे लागते .बांधकाम करताना निकृष्ट वळू, हलक्या दर्जाचे सिमेंट आणि कांक्रीट तयार करताना सिमेंटचा वापर कमी तर रेतीचा उपयोग जास्त केला जातो. पाणी मारण्याच्या नावाखाली सिमेंट व गिट्टी एकत्र करण्यासाठी वापरले जाईल तेवढेच पाणी असते. या सर्व प्रकाराने रस्त्याची वाट लागली आहे. यासोबतच निधीचाही अपव्यय होत आहे.कोणताही कंत्राटदार सिमेंट रस्त्याचे कंत्राट घेण्यासाठी उड्या मारतात. लोकप्रतिनिधी आपल्या डमी ठेकेदाराच्या माध्यमातून कंत्राट घेतात. केवळ आठ ते दहा दिवसात रस्त्याची निर्मिती केली जाते. लगेच त्याचे बिलही काढले जाते. कमी श्रमात अधिक पैसे कमाविण्याचा सिमेंट रस्ता एक सोपस्कर मार्ग झाला आहे. काही महिन्याअगोदर लाखांदूर तालुक्यातील चिकना, बोथली, बारव्हा गावात सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र याकडे लक्ष द्यायला कोणत्याच अधिकाऱ्याला वेळ नसल्याचे दिसून येते. वरिष्ठांनी लक्ष देऊन या प्रकरणाची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येऊ शकते.