भंडारा : आपल्या देशात विविधतेत एकता दिसून येते. जगात कुठेही नसेल अशी संस्कृती आपल्याला लाभली आहे. आपले सण, उत्सव आपल्याला एकात्मतेची शिकवण देते. मकरसंक्रात हा तर ‘तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असा संदेश देते. सर्वांनी या सण उत्सवातून सकारात्मक दृष्टी ठेवली तर समाजातील गुन्हेगारी निश्चितच कमी होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी सांगितले.संक्रातीच्या मुहूर्तावर ‘लोकमत’तर्फे ‘गुड बोला, गोड बोला’ अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत बोलताना पोलीस अधीक्षक विनिता साहू म्हणाल्या, चांगला विचार हा प्रगतीकडे घेवून जातो. भविष्यावरही चांगला परिणाम होतो. सर्वांनी सकारात्मक दृष्टीकोण ठेवला तर समाजातील गुन्हेगारीही कमी होईल. आपले सण उत्सव हाच संदेश देतात. मकरसंक्रातीनिमित्त जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जाणार आहे. पोलीस ठाण्याच्या माध्यमातून नागरिकांना तिळ-गुळ देवून गोड गोड बोला असे आवाहन केले जाईल. सामाजिक एकोप्यासाठी व गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी सण, उत्सवांचा सकारात्मक अर्थ घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.वाहतूक पोलिसांतर्फे विविध मोहीम राबविताना अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. हा प्रकार टाळण्यासाठी वाहतूक शाखेच्यावतीने शहरात वाहनधारकांना संक्रातीनिमित्त तिळगुळ देवून शुभेच्छा दिल्या जातील. यामुळे वादाचे प्रसंग टळतील आणि नागरिक पोलिसांना सहकार्य करतील.
सण, उत्सवातून मिळते एकात्मतेची शिकवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:11 IST
आपल्या देशात विविधतेत एकता दिसून येते. जगात कुठेही नसेल अशी संस्कृती आपल्याला लाभली आहे. आपले सण, उत्सव आपल्याला एकात्मतेची शिकवण देते. मकरसंक्रात हा तर ‘तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असा संदेश देते. सर्वांनी या सण उत्सवातून सकारात्मक दृष्टी ठेवली तर समाजातील गुन्हेगारी निश्चितच कमी होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी सांगितले.
सण, उत्सवातून मिळते एकात्मतेची शिकवण
ठळक मुद्देपोलीस अधीक्षक विनिता साहू म्हणतात