उड्डाण प्रकल्पाचा उपक्रम : महिलांची लक्षणीय उपस्थितीभंडारा : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उड्डाण प्रकल्प भंडाराच्या वतीने प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक मौजा धारगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या भव्य पटांगणावर रविवार रोजी गुलाबी मेला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या गुलाबी मेलामध्ये महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता वाढावी, समाजातील कुप्रवृत्ती पासूण स्वत:चे संरक्षण कसे करावे व मदत कशी मिळावी. त्यासोबतच अनेक क्षेत्रात महिलांसाठी असलेल्या संधी व त्यांचे हक्क यावर याप्रसंगी महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच युवती व महिलांमध्ये सहकार्य, संघवृत्ती, समानतेची भावना वाढीस लावणे व त्याचा समाज विकासाचा सहभाग वाढवून समाज मनात महिलांची सामाजिक प्रतिष्ठा वाढावी या उद्देशाने विविध रंगी छोटेखाणी एकूण ३२ खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात भंडारा जिल्ह्यातील ६५ गावांतील ७०४ महिला १५६ स्वयंसेविका, १७५ उड्डान रोजगार प्रशिक्षण केंद्राच्या युवती, व उड्डाण प्रकल्पाचे २५ कर्मचारी असे एकुण १०६० लोकांनी सहभाग दर्शविला.गुलाबी मेला महोत्सावात आयोजित छोटेखानी क्रिडा स्पर्धेनंतर विजेत्या युवती व महिलांना बक्षीस वितरीत करण्यात आले. त्यासोबतच मागील एका वर्षापासून उड्डाण प्रकल्पाशी जुडलेल्या व गावात प्रकल्प राबविण्यासाठी मोलाची कामगिरी बजावत असणाऱ्या स्वयंसेविका यांना प्रशस्तीपत्र वितरीत करण्यात आले. तसेच उत्कृष्ठ स्वयंसेविका पुरस्कार, मैजीक बस उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कार व समाज विकासात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सुध्दा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.सदर गुलाबी मेला महोत्सवाचे उद्घाटनीय कार्यक्रमाला प्रमूख अतिथी व मार्गदर्शक म्हणून बाल कल्याण समिती भंडाराच्या सदस्य वैशाली सतदेवे, धारगाव ग्रामपंचायतच्या मानसी कोटांगले, जि.प. शाळा धारगाव येथील मुख्याध्यापिका श. बे. खुर्चाणी, टी. एम. एफचे अविजीत रॉय, परिमल वाडेकर, विवेक सिंग, चित्रांत जयस्वाल, गिरीश लोखंडे उपस्थित होते. तर बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून भंडारा जिल्ह्याच्या पीएसआय रुपाली फटींग, गुंथाराच्या सरपंच शुभांगी सार्वे, कारधा, सरपंच शितल करंडे, खुर्शीपार सरपंच मिरा मस्के, मंडणगाव, सरपंच सविता बांडेबुचे आदी पाहुणे उपस्थित होते. संचालन दिपमाला सातपुते यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा कार्यक्रम अधिकारी निक्की प्रेमानंद यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
धारगाव येथे गुलाबी मेला महोत्सव उत्साहात
By admin | Updated: March 7, 2017 00:30 IST