लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : कृष्णमुरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयांतर्गत राष्ट्रीय हरित सेना, जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबतर्फे साकोली शहरात सीबीएमपी पक्षीगणना कॉमन बर्ड मॉनिटरिंग कार्यक्रमांतर्गत बीएनएचएस मुंबईच्या सहकार्याने ट्रान्सेक्ट पद्धतीने घेण्यात आली.यावेळी ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा. अशोक गायधने यांनी सीबीएमपी पावसाळी पक्षी गणनेबद्दल मार्गदर्शन करून सर्व सहभागी उत्साही पक्षी निरीक्षकांना सुचना केल्या. त्यानंतर साकोली गाव तलाव ते सेंदूरवाफा तलाव या दोन चौ.किमी परिसराचे १० भाग पाडून प्रत्येक भागात ट्रान्सेक्ट पद्धतीने पक्षीगणना करण्यात आली.ट्रान्सेक्ट पद्धतीला निसर्गमित्र शुभम बघेल, आदित्य शहारे, बाळकृष्ण मेश्राम, युवराज बोबडे यांनी सहकार्य करून सर्व विद्यार्थ्यांचे मॉनिटरिंग केले.यावेळी ० ते २०० मीटरच्या पट्ट्यात ५ प्रकारचे २५ पक्षी आढळले. २०० ते ४०० मीटरच्या पट्ट्यात ६ प्रकारचे ४० पक्षी आढळले. ४०० ते ६०० मीटरच्या पट्ट्यात ७ प्रकारचे २१ पक्षी आढळले. ६०० ते ८०० मीटरच्या पट्ट्यात ५ प्रकारचे ९ पक्षी आढळले. ८०० ते १००० मीटरच्या पट्ट्यात ८ प्रकारचे ४१ पक्षी आढळले.१००० ते १२०० मीटरच्या पट्ट्यात तीन प्रकारचे ७ पक्षी आढळले. १२०० ते १४०० मीटरच्या पट्ट्यात ३ प्रकारचे १२ पक्षी आढळले. १४०० ते १६०० मीटर पट्ट्यात २ प्रकारचे ३ पक्षी आढळले. १६०० ते १८०० मीटरच्या पट्ट्यात दुर्मिळ ड्रोंगो कुकु पक्षी तसेच इतर २ जातीचे पक्षी आढळले. शेवटच्या १८०० ते २००० मीटरच्या पट्ट्यात ७ प्रकारचे ४० पेक्षा जास्त पक्षी आढळले. पक्षी निरीक्षण व पक्षीगणनेचा अहवाल बी.एन. एच.एस. मुंबई सी.बी.एम.पी. प्रोजेक्ट आॅफीसर नंदकिशोर दुधे यांचेकडे पाठविण्यात आला.पक्षीगणना उपक्रमाकरीता संस्थाध्यक्षा विद्या कटकवार, प्रा. विजय देवगिरकर यांच्यासमवेत नेचर क्लबचे कार्यकर्ते शुभम बघेल, बाळकृष्ण मेश्राम, आदित्य शहारे, युवराज बोबडे, पियुष भलावी, संकल्प वैद्य, जतीन बिसेन, गौरंग खोटेले, शानिद पठाण, दानिश पठाण, रितीक शौरी, आदित्य सोनकुसरे, तुषार कांबळे, जयेश मेश्राम, हितेश बडवाईक, आर्यन टेंभूर्णे, सोनटक्के, सुमित तिडके, मिनल संग्रामे, डिंपल कापगते, मायावती उपरीकर, चेतना वाघमारे, रोशन बागडे, दिव्या राखडे आदी विद्यार्थ्यांनी व आयोजक पदाधिकाऱ्यांनी सहाकार्य केले.
साकोली येथे ‘सीबीएमपी’ पक्षीगणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:21 IST
कृष्णमुरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयांतर्गत राष्ट्रीय हरित सेना, जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबतर्फे साकोली शहरात सीबीएमपी पक्षीगणना कॉमन बर्ड मॉनिटरिंग कार्यक्रमांतर्गत बीएनएचएस मुंबईच्या सहकार्याने ट्रान्सेक्ट पद्धतीने घेण्यात आली.
साकोली येथे ‘सीबीएमपी’ पक्षीगणना
ठळक मुद्देट्रान्सेक्ट पद्धतीने केली पक्षी निरीक्षण : ग्लोबल नेचर क्लब साकोलीचा उपक्रम