लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : फिरते पथक, वन प्रकल्प विभाग गोंदिया व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यकेंद्र जांभडी यांच्या संयुक्त गस्तीमध्ये राखीव जंगलामध्ये अवैधरीत्या रेतीचा उपसा करीत असलेल्या चार जणांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले, तसेच रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टरसुद्धा जप्त केला. ही कारवाई २४ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजता करण्यात आली आहे. माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे फिरते पथक व प्रविचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एन. नंदेश्वर व जांभडी केंद्राचे वनपरिक्षेत्राधिकारी देशमुख व वनपाल सोनवाने यांनी शेंडा बीट कक्ष क्रमांक-५१५ मुत्रीजोब नाल्यात विरलन कामाचे राखीव जंगलामध्ये अवैधरीत्या प्रवेश करून रेती उपसा करीत असलेल्या चार जणांना रंगेहात पकडले. वन कर्मचाऱ्यांनी महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर, नवीन ट्रॉली क्रमांक एमएच ३५/एफ-४९४५ आहे. ट्रॉलीमध्ये अर्धा ब्रास रेती भरलेली होती. ट्रॅक्टर विजयकुमार यशवंत सोनवाने रा. जांभडी यांच्या मालकीचे असून, चार आरोपींमध्ये गोपींद्र प्रकाश चामलाटे (३०) रा. जांभडी, मुकेश तुळशीराम चामलाटे (२७) रा. जांभडी, विक्की राजकुमार नेवारे (२२) रा. जांभडी व रवींद्र काडू कोराम (३२) रा. जांभडी यांचा समावेश आहे. त्यांच्यावर भारतीय वनअधिनियम १९२७ व भारतीय दंड संहिता १८६० व वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलमान्वये गुन्हा नोंद करून कार्यवाही करण्यात आली. या चारही आरोपींना अटक करून २६ फेब्रुवारीला सडक-अर्जुनी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर करून सोडले आहे. वन प्रकल्प विभाग गोंदियाच्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
जंगलातून रेतीचा उपसा करताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 05:00 IST
माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे फिरते पथक व प्रविचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एन. नंदेश्वर व जांभडी केंद्राचे वनपरिक्षेत्राधिकारी देशमुख व वनपाल सोनवाने यांनी शेंडा बीट कक्ष क्रमांक-५१५ मुत्रीजोब नाल्यात विरलन कामाचे राखीव जंगलामध्ये अवैधरीत्या प्रवेश करून रेती उपसा करीत असलेल्या चार जणांना रंगेहात पकडले.
जंगलातून रेतीचा उपसा करताना पकडले
ठळक मुद्देट्रॅक्टर केला जप्त : वन विभागाची कारवाई, चार जणांना अटक