शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रोखपाल व तलाठी लाच घेताना अडकले जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:34 IST

मोहाडी पंचायत समितीचे रोखपाल व भंडारा तालुक्यातील खरबी येथील तलाठी यांना दोन वेगवेगळया गुन्ह्यात लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देमोहाडी, खरबी येथील घटना : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

आॅनलाईन लोकमतभंडारा : मोहाडी पंचायत समितीचे रोखपाल व भंडारा तालुक्यातील खरबी येथील तलाठी यांना दोन वेगवेगळया गुन्ह्यात लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. ही कारवाई भंडारा व नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. या कारवाईने पंचायत व महसूल विभागात खळबळ उडाली आहे.अखिल भुवण पारधी (३८) असे मोहाडी येथील रोखपाल तर राजेंद्र सिंग सोलंकी (५७) असे खरबी येथील तलाठ्याचे नाव आहे. अखिल पारधी यांना पाच हजार रुपयांसह तर राजेंद्र सोलंकी यांना सहा हजार रुपयाच्या रक्कमेसह रंगेहात पकडण्यात आले.मोहाडी पंचायत समितीमोहाडी पंचायत समितीचे रोखपाल (कनिष्ठ सहायक) अखिल पारधी यांच्याकडे तक्रारदार यांनी शेतीवर धडक सिंचन विहिरी योजनेंतर्गत २०१७ मध्ये मंजूर झालेल्या २ लाख ५० हजार रुपयांचा मंजूर झालेल्या निधीबाबद विचारणा केली. यावर अखिल पारधी यांनी तक्रारदार यांना सदर योजना त्यांच्या वडीलांच्या नावाने मंजूर झाली असून निधी वडीलांच्या खात्यावर जमा करुन देतो असे सांगून पाच हजार रुपयांची मागणी केली. यानंतर उर्वरित रकमेकरिता पारधी यांनी पुन्हा पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी पारधी यांची तक्रार भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीनुसार सापळा रचून पारधी यांना पंचायत समिती परिसरातच आज सोमवारला पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी पारधी यांच्या विरुध्द मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, पोलीस कर्मचारी गणेश पडवाल, गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, पराग राऊत, शेखर देशकर, निलेश मेश्राम यांनी केली.खरबी साझा तलाठीआई-वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर असलेली खरबी येथील शेतजमीन वारसा हक्काने चार भावांचे नावे चढवून फेरफार घेण्याचा प्रकरणी खरबीचे तलाठी राजेंद्रसिंग सोलंकी यांनी तक्रारीकर्त्यांना सहा हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार व त्यांचा चार भावांनी वडीलोपार्जित जमिनीचे कागदोपत्री हिस्सेवाटणी करुन घेण्याकरिता भंडारा दुय्यम निबंधक कार्यालयात पाच भावांमध्ये शेतजमीनीचे हिस्सेवाटे नोंदणीकृत करुन घेतले. त्यानंतर रजिस्ट्रीच्या आधारे प्रत्येकांचे नावे वेगवेगळे करुन घेण्याकरिता खरबी साझाचे तलाठी यांच्याकडे अर्ज केला. फेरफार संबंधात तक्रारदार हे तलाठी राजेंद्रसिंग सोलंकी यांना भेटले असता त्यांनी फेरफार घेण्याकरिता सहा हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदार यांनी तलाठी राजेंद्रसिंग सोलंकी यांच्याविरुध्द नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन सोमवारला सापडा रचला. दरम्यान तक्रारदार यांच्याकडून सहा हजार रुपये स्विकारतांना तलाठी सोलंकी यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी तलाठी सोलंकी यांच्याविरुध्द जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार करुन अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, पोलीस कर्मचारी गजानन गाडगे, शंकर कांबळे, दिप्ती मोटघरे, रेखा यादव यांनी केली.