शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

कार बेपत्ताच; गोताखोर परतले

By admin | Updated: August 14, 2014 23:33 IST

कारधाहून भंडाराकडे येणाऱ्या मार्गावरील वैनगंगा नदीच्या लहान पुलावरुन भरधाव कार कोसळल्याची घटना मंगळवारला रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या बेपत्ता कारचे दोन

दिवसभर चालले शोधकार्य : पाणबुडीची मदत घेण्याचा शोधपथकाचा सल्लाभंडारा : कारधाहून भंडाराकडे येणाऱ्या मार्गावरील वैनगंगा नदीच्या लहान पुलावरुन भरधाव कार कोसळल्याची घटना मंगळवारला रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या बेपत्ता कारचे दोन दिवसांपासून शोधकार्य सुरू असूनही कारचा अद्याप शोध लागलेला नाही. नागपूर महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांनी कारचा शोध घेतला. परंतु, त्यांना कार आढळून न आल्यामुळे हे पथक गुरुवारला सायंकाळी जिल्हा प्रशासनाला अहवाल देऊन परतले. नागपूर महानगर पालिकेचे १६ आणि नॅशनल डिजास्टर रिस्पांस फोर्स (एनडीआरएफ) चे १९ असे ३५ जवानांचे दोन पथक नदीत बुडालेल्या बेपत्ता कारचा शोध घेण्यासाठी बुधवारला रात्री भंडाऱ्यात पोहोचले. त्यानंतर गुरुवारला सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यांनी बेपत्ता कारचा शोध घेतला. परंतु, नदीत कार गवसली नाही.नदीचा जलस्तर घटलावैनगंगा नदीचा जलस्तर बुधवारला ४.३० मीटर इतका होता, आज गुरुवारला ३.९० मीटर इतका असून कालच्या तुलनेत जलस्तर अर्धा मीटरने कमी झालेला आहे. त्यामुळे बेपत्ता कार सापडण्याची शक्यता बळावली होती. परंतु शोधकार्यातील पथकाला कारचा शोध लागला नाही. ३० फूट खोलात घेतला शोधबेपत्ता कारचा बुधवारला शोध न लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन दलाला पाचारण केले. या विभागाचे प्रमुख पी. एन. कावळे व त्यांचे सहकारी सुनील राऊत, के. आर. कोटे यांच्या नेतृत्वात १६ सदस्याच्या पथकाने वैनंगगा नदीपात्र पिंजून काढले. त्यानंतर या दलातील जवानांनी आॅक्सिजनचे सिलिंडर्स घेऊन ‘स्कुबा ड्रायव्हिंग’ केली. त्यांनी ३० पूट खोल डोहात जावून शोध घेतला. यावेळी स्थानिक लोकांच्या सूचनांनुसार आणि त्यांना सोबत घेऊन गळ, लोहचुंबकांच्या सहाय्याने शोध घेतला, तरीही कार सापडली नाही.बेपत्ता कारची पोलिसात तक्रारकारधाहून भंडाराकडे येणाऱ्या मार्गावरील वैनगंगा नदीच्या लहान पुलावरुन भरधाव इंडिका कार क्र.एम.एच.३१/ई.के.२१५२ नदीत कोसळल्याची घटना मंगळवारला घडली. अजय भादुडी रा.भंडारा, राहुल पितळे, विक्रांत वैद्य रा.नागपूर हे मंगळवारपासून बेपत्ता आहेत. हे तिघेही ज्या कार क्रमांक एम.एच.३१/ ई.के. २१५२ ने प्रवास करीत होते, ती कार नागपूर येथील गौरव शिंगोटे यांच्या मालकीची आहे. दरम्यान, शिंगोटे यांनी इंडिका कार बेपत्ता असल्याची तक्रार गुरुवारला दुपारी भंडारा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. रात्री उशिरा नागपूर येथील पितळे कुटूंबियांनी राहुल पितळे हे बेपत्ता आहेत, या आशयाची तक्रार नोंदविली. उद्या शुक्रवारला सकाळपासून बेपत्ता कारचे शोधकार्य सुरु होणार असून बेपत्ता असलेल्या अजय भादुडी, रा.भंडारा, राहुल पितळे, विक्रांत वैद्य रा.नागपूर यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तुकडोजी वॉर्ड भंडारा, असे दाखविण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (जिल्हा प्रतिनिधी)