शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांना द्यावी लागणार आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 11:26 IST

Bhandara : प्रसारमाध्यमातून द्यावी लागणार तीन वेळा जाहिरात

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे सर्व उमेदवारांना आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मतदारांना द्यावी लागणार आहे. उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, याची सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांमध्ये द्यावी लागणार आहे.

निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबरला जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकामध्ये यासंदर्भातील निर्देश विस्तृतपणे प्रसिद्ध केले आहे. भंडारा जिल्ह्यातील उमेदवारी जाहीर केलेल्या सर्वांनी याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. 

निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबरला जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकामध्ये यासंदर्भातील निर्देश विस्तृतपणे प्रसिद्ध केले आहे. भंडारा जिल्ह्यातील उमेदवारी जाहीर केलेल्या सर्वांनी याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाल्यापासून तर मतदान होईपर्यंत ही माहिती जाहीर करणे अनिवार्य केले आहे. मतदारांना माहिती होईल, अशा प्रकारे प्रसारमाध्यमामधून तीन वेळा जाहिराती देऊन जनतेला माहिती द्यावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी प्रचाराच्या काळात तीन वेळा वृत्तपत्रांतून आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून गुन्हेगारी पार्श्वभूमी संदर्भातील माहिती प्रकाशित करणे आवश्यक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार उभे करणाऱ्या राजकीय पक्षाने सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती संकेतस्थळ, वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून तीन वेळा प्रसिद्ध करणेदेखील आवश्यक आहे. 

कारवाईत १ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त१५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यात या तारखेपासून जिल्हा प्रशासनाच्या पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एकूण एक कोटी १० लाख ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात भंडारा मतदारसंघात ३६ हजार ५९८ लीटर दारू हस्तगत करण्यात आली. तसेच साकोली विधानसभा क्षेत्रात १२ हजार २१३ लीटर तर तुमसर विधानसभा क्षेत्रात ३९ हजार १३६ लीटर दारू जप्त करण्यात आली. याची किंमत ८२ लाख ३८ हजार रुपये सांगण्यात येते. तर अन्य साहित्य मिळून २८ लाख १० हजार रुपये जप्त केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४bhandara-acभंडाराPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारी