शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

कोका वन्यजीव अभयारण्यात ८६५ वन्यप्राण्यांची गणना

By admin | Updated: May 20, 2014 23:28 IST

कोका वन्यजीव अभयारण्यात १४ मे रोजी बौद्ध पौर्णिमेला वन्य प्राण्यांची प्रगणना झाली. प्रगणनेत ७२ वनकर्मचारी व २६ अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

करडी (पालोरा) : कोका वन्यजीव अभयारण्यात १४ मे रोजी बौद्ध पौर्णिमेला वन्य प्राण्यांची प्रगणना झाली. प्रगणनेत ७२ वनकर्मचारी व २६ अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. एकूण १०,००० हेक्टर क्षेत्रावर झालेल्या गणनेत ८६५ वन्यप्राण्यांची गणना झाली असून अभयारण्यात वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणात संचार आढळून आले. विदर्भातील पर्यटकांचे पाऊल आता कोका अभयारण्याकडे वळायला लागले आहेत. कोका वन्यजीव अभयारण्याला सन २०१३ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी मिळाली. २ मे रोजी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. पर्यटकांसाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात आल्या. जंगलातील रस्ते, कृत्रिम पाणवठे, सोलर हँडपंप लावले गेले. पर्यटकांना जंगलाचा आनंद घेता यावा यासाठी वाहनांची सुविधा, सोबत वन्यप्राण्यांची, वनौषधी व अन्य बाबींची खडान्खडा माहिती व्हावी म्हणून गाईडना प्रशिक्षण देण्यात आले. अभयारण्यात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात संचार व विविधता असली तरी नेमके कोणत्या जातीच्या प्राण्यांची संख्या किती आहे याचा नेमका अंदाज नव्हता. त्यातही तृणभक्षक प्राणी, सरपटणारे प्राणी आणि पक्ष्यांचे स्वरुप याची निश्चित अवस्था समजत नव्हती. वाघ, बिबट आदी हिंस्त्र प्राण्यांचा नेमका अंदाज नव्हता. १४ मे रोजी बौद्ध पौर्णिमेला वन्यप्राण्यांची प्रगणना झाली. त्यातूनच निश्चित आकडा आता समजायला लागला आहे. बौद्ध पौर्णिमेला एकूण ३५ वन कंपार्टमेंट म्हणजे १०,००० हेक्टर वनक्षेत्रामधील जंगलात प्रगणना झाली. त्यासाठी २५ मचान उभारले गेले. १० कृत्रिम पानवठे त्यातही १० सोलर हँडपंप, २५ नैसर्गिक तलाव आदी ठिकाणावर गणना झाली. प्रमणनेत १५ वनरक्षक, ४ वनक्षेत्र सहाय्यक, २ वनक्षेत्राधिकारी, १ सहाय्यक वनसंरक्षक, ५० हंगामी वनमजूर, २६ अशासकीय संस्थांचे सदस्य आदींचे माध्यमातून यंत्रणा कामाला लावली गेली. असे आढळून आले वन्यप्राणी नुकत्याच झालेल्या प्रगणनेत १ वाघ, ४ बिबट, ५ ससे, ५० अस्वल, १०६ गवे, १८६ डुक्कर, २९९ चितळ, निलघोडे २३, निलगाय ५६, रानकुत्रे ३२, सांबर ६६, मोर १८, भेंडकी ७, रानमांजर २, चौसिंगा ३, कोल्हे ७ अशाप्रकारे २४ तासात झालेल्या प्रगणेत वन्यप्राणी आढळून आले. सदर प्रगणना दि. १४ मे रोजी सकाळी १० वाजता ते १५ मे रोजी सकाळी १० वाजतापर्यंत पूर्ण करण्यात आली. पर्यटकांचा ओढा अभयारण्याकडे कोका वन्यजीव अभयारण्याकडे पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे. पर्यटकांसाठी अभयारण्यात सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. अतिशय कमी कालावधीत यंत्रणा कामाला लावण्यात आली. समस्या सोडविण्यात बर्‍याच प्रमाणात यश आले. त्याचा निश्चित फायदा पर्यटन व्यवसाय वाढीस झाला. विदर्भातील पर्यटक अभयारण्याकडे वळले असल्याची माहिती कोका वन्यजीव अभयारण्याचे वनक्षेत्राधिकारी कुंभारे, वनक्षेत्र सहाय्यक मारबदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर)