शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत मिठाई खरेदी करताय? पण मिठाईवर आधी 'बेस्ट बिफोर' पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 13:13 IST

Bhandara : मिठाई खरेदी करताना फसवणुकीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घरोघरी कोणते पदार्थ बनवायचे, कोणती मिठाई खरेदी करायची आदींची प्लॅनिंग सुरू झाली आहे. अशावेळी 'बेस्ट बिफोर' म्हणजे तारीख पाहणे आवश्यक आहे. मिठाई खरेदी करताना फसवणूकही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही मिठाई खरेदी करताना 'बेस्ट बिफोरच' बघून खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषधी विभागाने केले आहे.

अनेकजण दिवाळीचा फराळ विविध गावांत तसेच देश-विदेशांत पाठवत असतात. आता उपाहारगृहे, हॉटेल्स येथे फराळ व मिठाई बनविण्यास सुरुवात झाली आहे. अधिक नफा मिळविण्याच्या अनुषंगाने हॉटेल्स संचालक, उपाहारगृह, मिष्टान्न भांडार चालक फसवणूक करण्याची शक्यता आहे. 

बहुतेकवेळा तर मुदतबाह्य पदार्थसुद्धा विकण्याचे प्रकार उघडकीस येतात. बरेचदा मिठाई किंवा दुग्धजन्य पदार्थाचा वापर केव्हापर्यंत करायचा, यासंदर्भात त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदांवर लिहिलेले नसते. परिणामी हलके व बुरशी चढलेले पदार्थही ग्राहकांच्या माथी मारले जातात. ते खराब पदार्थ सेवन केले की, अनेकांची प्रकृती खालावण्याची शक्यता असते. त्यामुळे असे कोणतेही पदार्थ खरेदी करता पूर्णतः तपासणी करून खरेदी करावी. त्यामुळे ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन अन्न औषधी प्रशासनाने केले आहे. 

बेस्ट विफोर लिहिणे आवश्यक प्रत्येक मिठाई व दुग्धजन्य पदार्थाच्या ट्रेसमोर बेस्ट बिफोर लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. काही जण लिहितात, तर काही जण दुर्लक्ष करतात; मात्र आपण खरेदी करताना संपूर्ण चौकशी करून केव्हा बनवले, किती दिवस चालणार, हे बघूनच खरेदी करावे. सर्व ग्राहकांनी सजग असावे. पाकीटबंद, दुग्धजन्य पदार्थ मिठाई खरेदी करत असताना ते किती दिवस चालणार आहेत, याची तपासणी अवश्य करावी.

भेसळ होऊ नये म्हणून पथक स्थापनदिवाळीच्या काळात भेसळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्न व औषध विभागाने पथक स्थापन केले आहे. भेसळ प्रकार लक्षात आला तर अन्न व औषध प्रशासन विभागाला सांगितले पाहिजे. पदार्थ खरेदी करताना ताजे आहे का, शिळे तर नाही ना, असेही विचारावे.

"अन्न व औषध विभाग भेसळीवर लक्ष ठेवून राहणार आहे. भेसळ लक्षात असल्यास संशयित नमुने घेऊन तपासणीला पाठवले जाणार आहेत. दोष आढळून आल्यास त्या दुकानदारावर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना भेसळयुक्त पदार्थ आढळून आल्यास तत्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवावे."-प्रशांत देशमुख, सहायक आयुक्त, भंडारा

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024bhandara-acभंडारा