स्मारकाकरिता इमारतीची पाहणी

By Admin | Updated: March 28, 2015 00:36 IST2015-03-28T00:36:30+5:302015-03-28T00:36:30+5:30

येथील निवासी तथा विदर्भातील प्रसिद्ध सिने कलावंत म्हणून किशोर शाहू यांची ओळख आहे.

Building inspection for the monument | स्मारकाकरिता इमारतीची पाहणी

स्मारकाकरिता इमारतीची पाहणी

भंडारा : येथील निवासी तथा विदर्भातील प्रसिद्ध सिने कलावंत म्हणून किशोर शाहू यांची ओळख आहे. त्यांच्या चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वांना माहिती व्हावी तसेच निवासस्थानाला राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याच्या दृष्टीकोनातून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली आहे. यामुळे ग्रीनहेरीटेजच्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली आहे.
ग्रीनहेरिटेज संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद सईद शेख यांनी नागपूर येथे शीतसत्रादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना. विनोद तावडे यांना याबाबद निवेदन दिले होते. शाहू यांच्या निवासस्थानाला सांस्कृतिक वारसा घोषित करून त्यांचा जन्मशताब्दी वर्ष शासनातर्फे साजरा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.
सदर पत्राची दखल घेवून केलेल्या मागणी बाबत आवश्यक ती कारवाई करून भंडारा व पलाडी येथील ही इमारत ही राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यायोग्य आहे किंवा नाही, याबाबद इमारतीची पाहणी करून अहवाल सादर करावे, असे पत्र सहायक संचालक पुरातत्व विभाग नागपूर यांना राज्य शासनातर्फे पाठविण्यात आले होते. या पत्राची प्रत संस्थेलाही प्राप्त झाली. त्ळा अनुषंगाने पुरातत्व विभागाचे अधिकारी भंडारा येथे आले. त्यांनी शेख यांच्यासोबत इमारतीची पाहणी केली. शेख यांच्या माहितीनुसार, किशोर शाहू भंडारा येथील मन्रो शाळेत शिक्षण घेतले. नागपूरच्या मॉरिस कॉलेजहून एम.ए. केले. शहरातील रेल्वे स्टेशन मार्गावर अरविंद शाहू यांचे निवासस्थान (सध्या राहत असलेले) हे किशोर शाहू यांचे असून जवळच पलाडी येथे ही त्यांचा जूना बंगला व शेती आहेत. त्यांचे वडील स्व. कन्हैय्यालाल शाहू हे जमीनदार होते. बंगला राज्य सरंक्षित स्मारक झाल्यास राष्ट्रीय पातळीवर भंडारा शहराची ख्याती होईल, यात शंका नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर दखल होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Building inspection for the monument