शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:01 IST

सुरजचा मृतदेह रस्त्यालगतच्या नालीत पडून होता. शहर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. ठाणेदार लोकेश कानसे आपल्या ताफयासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केला.

ठळक मुद्देशुक्रवारीतील थरार : मानेवर आणि पोटावर धारदार शस्त्राचे वार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धारदार शस्त्राने मानेवर आणि पोटावर वार करुन एका तरुणाचा भरदिवसा निर्घृण खून करण्याची घटना येथील गजबजलेल्या शुक्रवारी परिसरात सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. खून कोणत्या कारणाने झाला हे तुर्तास कळू शकले नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. अवघ्या १५ दिवसात शहरात खून होण्याची ही दुसरी घटना होय.सुरज परमाल यादव (२५) रा. किसान चौक भंडारा असे मृताचे नाव आहे. सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सुरज आपल्या मोटारसायकलने जात असताना दोन ते तीनच्या संख्येने असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. मानेवर आणि पोटावर सपासप वार केल्याने काही क्षणातच तो खाली कोसळला आणि जागीच ठार झाला. भरदिवसा झालेल्या या खुनाने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली.या घटनेची माहिती होताच बघ्यांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली. सुरजचा मृतदेह रस्त्यालगतच्या नालीत पडून होता. शहर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. ठाणेदार लोकेश कानसे आपल्या ताफयासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केला.घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांनी भेट दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नेवसे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.भरदिवसा खून करुन आरोपी पसार झाले. वृत्तलिहीस्तोवर त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. स्थानिक शहर ठाण्याचे डीबी पथक आरोपींचा शोध घेत होते. आरोपींच्या अटकेनंतरच खूनाचे कारण पुढे येणार आहे. सुरज हा मुळचा नागपूर लगतच्या हिंगणा येथील रहिवासी असून तो आपल्या पत्नी व मुलासह किसान चौकात भाड्याचे घर घेवून राहत होता. रोज मजुरी करुन तो चरितार्थ चालवित होता. सुरजची पत्नी नागपूर येथे काही कामानिमित्त गेली होती. सायंकाळपर्यंत ती भंडारात पोहोचली नव्हती. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.भंडारात गुन्हेगारीने डोके वर काढलेशांत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा शहरात गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे अलिकडील काही घटनांवरुन दिसून येत आहे. मोटारसायकलचा कट मारण्याच्या कारणावरुन १९ जून रोजी सरफराज कासम शेख (१८) या तरुणाचा भंडारातील डॉ. हेडगेवार चौकात खून करण्यात आला होता. या घटनेची शाई वाळत नाही तोच सोमवारी भर दिवसा सुरज यादवचा खून करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र पोलिसांची करडी नजर असतानाही पंधरा दिवसात दोन खून झाल्याने भंडारा पोलिसांचा वचक संपला की काय? अशी शंका येत आहे.

टॅग्स :Murderखून