शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूल बांधकामाला वीज खांबांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:59 IST

देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुल बांधकामाकरिता उच्च दाब वीज वाहिण्या अडसर ठरत असल्याची माहिती पुढे आली आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला सीमेंट काँक्रीटचे पिलर उभे करणे सुरु केले आहे. परंतु तिसरा पिल्लर रेल्वे ट्रॅकजवळ बांधकामाकरिता वीज वाहिणीचा मोठा खांब अडसर ठरला आहे.

ठळक मुद्देउच्च दाब वाहिन्यांचा खांब। मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्ग मेगाब्लॉक करण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुल बांधकामाकरिता उच्च दाब वीज वाहिण्या अडसर ठरत असल्याची माहिती पुढे आली आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला सीमेंट काँक्रीटचे पिलर उभे करणे सुरु केले आहे. परंतु तिसरा पिल्लर रेल्वे ट्रॅकजवळ बांधकामाकरिता वीज वाहिणीचा मोठा खांब अडसर ठरला आहे. रेल्वे प्रशासनात त्याला हटविण्याकरिता खलबते सुरु असल्याचे समजते. या मार्गावर रेल्वे मेगाब्लॉग घेतल्याशिवाय पर्याय नसल्याने पर्यायाच्या शोधात आहे.मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी रेल्वे क्रॉसींग ५३२ वर उड्डाणपुलांची कामे मागील पाच वर्षापासून संथगतीने सुरु आहेत. रेल्वे तथा राज्य शासन संयुक्तरित्या सदर उड्डाणपुलाचे बांधकाम करीत आहे. रेल्वे विभाग रेल्वे ट्रॅकवरील मुख्य सिमेंट पिल्लर बांधकाम व त्यावरील सिमेंट काँक्रीटचा रस्ता (गडर) तयार करीत आहे. रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला रेल्वेने सिमेंट काँक्रीट पिल्लरचे कामे अंतिम टप्प्यात आहेत. परंतु तिसरा पिल्लर रेल्वे ट्रॅकच्या मधोमध मोकळ्या जागेत उभा करणार आहे. नेमका येथे उच्च वीज वाहिण्यांचा मोठा खांब असल्याने बांधकामास अडथळा निर्माण झाला आहे.अडसर ठरणारा वीज वाहिण्यांचा खांब हटविण्याकरिता रेल्वेचे स्थापत्य अभियंते व वीज अभियंत्याचे सध्या खलबते सुरु आहेत. मेगा ब्लॉक घेतल्याशिवाय बांधकाम करण्याची येथे अधिक शक्यता आहे. परंतु सिमेंट पिल्लर बांधकाम काही दिवस चालणार आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून दोन रेल्वे ट्रॅक ब्लॉक करून पिल्लरची बांधकाम करण्याचा निर्णय येथे रेल्वेने घेतल्याचे समजते. सध्या रेल्वेचे काम संथगतीने सुरु आहे.राज्य शासनाचे आतापर्यंत ८० टक्के उड्डाणपुलाचे काम झाले आहे. पुन्हा २० टक्के कामे शिल्लक आहेत. राज्य शासन येथे २५ कोटींचा निधी खर्च करीत आहे. तर रेल्वे येथे १६ कोटींची कामे करीत आहे. राज्य शासनाने आतापर्यंत २२ कोटींची कामे केली असून केवळ तीन कोटींची कामे शिल्लक असल्याचे समजते.राखेचा बंदोबस्त करावाउड्डाणपुल भरावात अदानी वीज कारखान्यातील फ्लाय अ‍ॅशचा भराव करण्यात आला आहे. फ्लाय अ‍ॅश रासायनिक असून पिठासारखी पातळ आहे. उड्डाणपुलांची संरक्षित भिंत दगडांची आहे. दगडातील गॅप (पोकळी)तून पावसाळ्यात फ्लाय अ‍ॅश पाण्यासह वाहून पोचमार्गावर पसरते. वाहनाच्या वाहतुकीमुळे ती मोठ्या प्रमाणात हवेत उडते. मानवी शरीराकरिता ती अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे संबंधित विभागाने त्या राखेचा कायम बंदोबस्त करण्याची गरज आहे.गत पाच वर्षापासून देव्हाडी उड्डाणपुलाची कामे अतिशय संथगतीने सुरु आहेत. सध्या रेल्वे ट्रॅकवरील वीज खांब अडसर ठरत आहे. उड्डाणपुल बांधकामात सतरा विघ्न येथे येत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उड्डाणपुल तात्काळ पूर्ण करावा.-इंजि. विपील कुंभारेमहासचिव, भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित विभाग, तुमसर.

टॅग्स :railwayरेल्वेelectricityवीज