लाचखोर लिपीक व शिपाई ‘एसीबी’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:47 PM2018-07-18T23:47:27+5:302018-07-18T23:47:59+5:30

गोसीखुर्द प्रकल्पासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपीक आणि शिपायाला बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाºयांनी रंगेहात पकडले.

A bribe clerk and a soldier in the 'ACB' net | लाचखोर लिपीक व शिपाई ‘एसीबी’च्या जाळ्यात

लाचखोर लिपीक व शिपाई ‘एसीबी’च्या जाळ्यात

Next
ठळक मुद्दे४० हजारांची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ट्रॅप’, भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी लाचेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोसीखुर्द प्रकल्पासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपीक आणि शिपायाला बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाºयांनी रंगेहात पकडले. सलग दुसºया दिवशी ही एसीबीची कारवाई झाल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
कनिष्ठ लिपीक चंद्रेश प्रकाश काटेखाये (३०), शिपाई योगेश दसारामजी भोंगाडे (२८) अशी लाचखोरांची नावे आहेत. चंद्रेश काटेखाये जिल्हाधिकारी कार्यालयातील गोसीखुर्द विशेष पॅकेज क्रमांक तीन मध्ये लिपीक म्हणून कार्यरत आहेत. तर योगेश हा गोसीखुर्द उपजिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी शिपाई म्हणून कार्यरत आहे.
गोसीखुर्द प्रकल्पात सुरेवाडा (जुना) येथील गावठाण संपादित करण्यात आले. संबंधित तक्रारकर्त्याला शासनाने २ लाख ९० हजार रुपये अनुदान मंजूर केले. त्याकरिता लागणाºया सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर प्रकरण मंजूर होऊन बँक आॅफ बडौदाच्या शाखेत सदर रक्कम जमा झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपीक चंद्रेश काटेखाये याने खात्यात जमा झालेल्या रकमेचा मोबदला म्हणून ४० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास बँकेला व तलाठ्याला पत्र देवून खाते बंद करण्याची धमकी दिली. यामुळे संबंधित तक्रारदार हतबल झाला. अखेर भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यावरून १७ जुलै रोजी पडताळणी दरम्यान ४० हजार रुपयांची लाच मागीतल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यावेळी संबंधित तक्रारकर्त्याकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना काटेखाये व भोंगाडे यांना रंगेहात अटक करण्यात आली. या दोघांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, प्रतापराव भोसले, गणेश पडवार, संजय कुरंजेकर, नितीन शिवणकर, गौतम राऊत, रविंद्र गभणे, सचिन हलमारे, शेखर देशकर, अश्विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, कोमलचंद बनकर, दिनेश धार्मिक आदींनी केली. लाचखोर अधिकारी आणि कर्मचाºयांमध्ये या धाडीमुळे धास्ती निर्माण झाली आहे.
दुसऱ्या दिवशीही कारवाई
भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मंगळवारी स्वस्त धान्य दुकानदाराला २ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. या वृत्ताची शाई वाळत नाही तोच बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लिपीक आणि शिपायाला रंगेहात पकडण्यात आले. सलग दुसºया दिवशीही एसीबीचा ट्रॅप झाल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात या ट्रॅपची दिवसभर दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

Web Title: A bribe clerk and a soldier in the 'ACB' net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.