पक्षाचे वरिष्ठ नेते नरेश माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेत आयोजित सभेत सर्वप्रथम नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, जि.प.चे माजी सदस्य दुर्गा तिराले, गोपाल तिराले, व्यापारी सेल तालुकाध्यक्ष दौलत अग्रवाल, किसान सेल अध्यक्ष ओमप्रकाश पारधी, सरपंच कैलाश धामडे, तालुका उपाध्यक्ष संतोष अग्रवाल, बारेलाल वरखंडे, सुखदास बसेना, बालमुकुंद शेंडे, पूजा वरखडे, ग्यानी साखरे, ओमप्रकाश उपराडे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सभेत बूथनिहाय कमिटी तयार करून संघटन बळकट करण्यावर अधिक भर देण्यात आला. तसेच कोरोना कालावधीत सावधानी बाळगून प्रत्येक कार्यकर्त्याने लस घेऊन नागरिकांनाही लस घेण्यास प्रोत्साहित करून प्रशासनास सहकार्य करावे, अशी सूचना करण्यात आली.