शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

कागदपत्रे जाळपोळ प्रकरणात दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:54 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील लेखा विभागात असलेल्या टेबलवरील महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

ठळक मुद्देप्रकरण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील लेखा विभागात असलेल्या टेबलवरील महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणाचा तपास आधी भंडारा पोलीस आणि त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर या पथकाने या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. कारवाईमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.दीपक अर्जुन मडावी व राकेश शाम चिंतलवार असे अटक करण्यात आलेल्या या दोन कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मडावी हे या कार्यालयात सहाय्यक लेखाधिकारी तर चिंतलवार हे वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदावर कार्यरत आहेत. ७ जुलै २०१७ ते १० जुलै २०१७ च्या दरम्यान डीआरडीए कार्यालयातील लेखा विभागात महत्त्वाची कागदपत्रे जाळण्यात आले होते. याची तक्रार वरिष्ठ सहाय्यक प्रवीण वझलवार यांनी भंडारा पोलिसात केली होती. या गंभीर प्रकरणात कार्यालयातील महत्त्वाच्या फाईल्स जाणीवपूर्वक जाळल्याचा संशय पोलिसांना आल्याने या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले होते. या प्रकरणात कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची साक्ष, नोंदी व चौकशी करण्यात आली. यात मडावी व चिंतलवार यांच्या उत्तरामुळे त्यांच्यावर संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता चिंतलवार यांनी महत्त्वाच्या फाईल्स जाळल्याच्या व अपहार केल्याची कबुली दिली.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात कोणतेही साहित्य खरेदी न करता बनावट बिल सादर करून शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार करून चिंतलवार यांनी चैनीच्या वस्तू खरेदी केल्या होत्या. अपहाराची ही रक्कम चिंतलवार यांनी लग्नामध्ये खर्च केल्याचेही कबुल केले आहे. बनावट देयके सादर करून रकमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याची बाब सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंवि ४०९, ४२०, ४७१, १२० (ब), २०१ (३४) कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पोटे, पोलीस हवालदार वामन ठाकरे, पोलीस नायक रोशन गजभिये, पोलीस कॉन्स्टेबल स्नेहल गजभिये, वैभव चामट हे करीत आहेत.असे करायचे ‘ते’ अपहारराकेश चिंतलवार हा ज्या घरी भाड्याने राहत होता. त्या घरमालकाच्या नावाने बँकेत खाते उघडून त्या खात्यावर आॅनलाईन बँकिंग सुविधा व घरमालकाकडून सही केलेले कोरे चेक घ्यायचे. त्या खात्यामध्ये शासकीय रकमेचे बनावटी बिल मंजूर केल्यानंतर रक्कम वळती करीत होता. ती रक्कम धनादेशाद्वारे काढून त्यातील काही रक्कम दीपक मडावी यांना देऊन त्यातील उर्वरीत रक्कम आॅनलाईन बँकिंगच्या माध्यमातून विविध कामात खर्च करीत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले.