शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अरुंद रस्त्यांवर हाड मोडणाऱ्या खड्ड्यांची भरमार; भंडारकर त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 12:02 IST

रहदारीचे मुख्य मार्गच जीवघेणे : भंडारा पालिकेसह बांधकाम विभागाचे दुर्लक्ष हे आहेत 'डेंजरस' रस्ते

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : पितळी भांडे, कोळसा, धान, मॅग्नीज, रेती यासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्याचे शहर मुख्यालय आता खड्यांसाठीही प्रसिद्ध झाले की काय? असे निदर्शनास येत आहे. शहरातील अरुंद रस्त्यांवर हाड मोडणारे जीवघेण्या खड्यांची भरमार झाली आहे. पावसाने रस्त्यांचे पितळ उघडे तर पाडलेच गुणवत्ताहीन कामाचीही पोलखोल केली आहे.

शहारात पार्किंगचा अभाव आहे. अतिक्रमणाची समस्या उग्र रूप धारण करून आहे. भंडारा शहरात बाहेरचा कुणी व्यक्ती आल्यास त्याचे स्वागत गचक्याने होते. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच खड्डे आहेत. तर शहराची काही स्थिती असेल याची जाणीव प्रत्यक्षरीत्या कदाचित त्या व्यक्तीला येत असावी, अंतर्गत रस्तेही खड्यांपासून सुटलेले नाहीत. महिनाभरात आलेल्या मुसळधार पावसाने डांबरी रस्त्यांची चांगलीच पोलखोल केली. काही मार्गावर तर एवढे जीव घेणे खड्डे आहेत की कुणाचा बळी जाईल याचा नेम नाही.

हे आहेत डेंजरस रस्ते शहरातील मिस्कीन टैंक चौक ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौंक सर्वात डेंजर रस्ता ठरल आहे. यानंतर राजीव गांधी चौक ते नागपूर बायपास मार्ग सर्वात डेंजरस ठरला आहे. गल्लीबोडीतील खड्डे तर विचारूच नका. मात्र या रस्त्यांची डागडुजी असो की रस्ते निर्मिती याकडे पालिका प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करत आहे. हा रस्ता आमच्या हद्दीत येत नाही, म्हणून चेंडू एकमेकांच्या दालनात टोलवला जात आहे.

टॅक्स द्यावे आणि खड्यातून जावेभंडारेकर पालिका प्रशासनाला टॅक्स देतात. या कराच्या माध्यमातूनच शहराचा चांगला विकास व्हावा, अशी जनसामान्यांची इच्छा असते. मात्र भंडारा शहर पालिका हद्दीतील रस्त्यांची लागलेली वाट व बिकट अवस्था पाहून विचारच येतो. पालिका प्रशासनाला कर देऊनही हाड मोडणाऱ्या रस्त्यातून वाटचाल करीत असताना अनेक प्रश्न उ‌द्भवतात. एखादवेळी जीवित हानी झाली, तर जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. उल्लेखनीय म्हणजे काही रस्त्यांवरील खड्डे चक्क अर्धा ते पाऊण फूट खोल आहेत. त्यात पावसाचे पाणी गेल्यावर ते किती खोल आहे, याची कल्पना येत नसल्याने सहजपणे अपघात घडत आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाbhandara-acभंडारा