मिक्सरचा जमाना : वडार समाज होतोय बेरोजगारजवाहरनगर : छन्नी हातोड्याने दगड घडविताना आपल्या जगण्याची जोडणी करणाऱ्या वडार समाजाचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला आहे. दळण, कांडण बंद झाले असून उखळ, पाटा, वरवंटा हद्दपार झाले आहे. या वस्तूंची जागा आता मिक्सरने घेतली आहे.पूर्वी धान्य दळणे, मिरची मसाला कांढणे अशी सर्व कामे उखळ, पाटा, वरवंट्यावर केली जात होती. प्रत्येक घरात या वस्तू असायच्या. नव्हे त्याला धार्मिक अधिष्ठान दिले होते. त्यामुळे या वस्तूंची पूजा केली जात होती. परंपरागत वडार समाज जंगलातून विशिष्ट दगड आणून त्यापासून जाते, वरंवटे, उखळ तयार करीत होते. छन्नी हातोड्याच्या साहाय्याने दगड घडवित होते. खलबत्ता, उखळ अशा वस्तू त्या बनवित आहे. परंतु अलीकडे स्वयंपाक घरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी वाढली. मिक्सर आले आणि दगडी साहित्य हद्दपार झाले. गृहिणींचे काम सोपे झाले असले तरी या वस्तू तयार करणाऱ्या या समाजावर बेरोजगारांची कुऱ्हाड कोसळली आहे. आठ-आठ दिवस एकही ग्राहक त्यांच्याकडे फिरकत नाही. या व्यवसायाला उतरती कळा लागल्याने वडार समाजातील तरुण इतर व्यवसाय शोधत आहे. परंतु वयोवृद्ध मात्र दुसरे कोणतेही काम होत नसल्याने हाच व्यवसाय करताना दिसत आहे. (वार्ताहर)आमचा रोजगारच संपलाघराच्या सजावटीसाठी बिल्डरकडून दगड घडवून घेतले जाते. कधी मागणी आली की वस्तू बनवून देतो. शासनाने सगळ्यांची सोय केली. परंतु पाथरवट समाजाला काहीच दिले नाही. सरकारने नवीन पिढीसाठी काही तरी करावे, आज आमचा रोजगार संपला आहे. पोटापाण्याचा व्यवसाय बंद पडल्याने हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
उखळ, पाटा, वरवंटा झाला कालबाह्य
By admin | Updated: April 9, 2015 00:42 IST